''लायन्स’तर्फे महिला दिनी विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''लायन्स’तर्फे महिला दिनी विविध कार्यक्रम
''लायन्स’तर्फे महिला दिनी विविध कार्यक्रम

''लायन्स’तर्फे महिला दिनी विविध कार्यक्रम

sakal_logo
By

‘लायन्स’तर्फे महिलादिनी विविध कार्यक्रम
इचलकरंजी, ता. ५ : जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. ८) दुपारी चार वाजता ‘नमो नारी’ समाज प्रबोधनचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध संस्थांच्या ८०० हून अधिक महिला सहभागी होतील, अशी माहिती श्रुतिका भंडारी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
नमो नारी रॅलीची सुरुवात जयहिंद मंडळापासून होणार असून, मुख्य मार्गावरून ही रॅली श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृहात येणार आहे. येथे महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमासाठी शौमिका महाडिक, वैशाली आवाडे, नीलम लोंढे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी नेहा कुंभार, विद्या गायकवाड, सुनंदा सोमाणी, विजया गदरे, किरण भराडिया, मीनाश्री कुंभार, सविता शेटे या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.१०) महिलांसाठी ब्रेस्ट चेक अप कॅम्प व डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर होणार आहे. शनिवारी (ता. ११) महिला व मुलींसाठी बद्धिबळ स्पर्धा होणार आहे. पत्रकार बैठकीस संगीता सारडा, रेखा सारडा, श्रद्धा सातपुते, एकता काबरा, महेंद्र बालर आदी उपस्थित होते.