Wed, June 7, 2023

हल्ला अटक
हल्ला अटक
Published on : 5 March 2023, 4:57 am
खुनी हल्ला करणाऱ्या
तिघांना ८ मार्चपर्यंत कोठडी
इचलकरंजी : तारदाळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विनोद कोराणे यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. राजू पाटील, दिपक दळवी आणि निखिल कांबळे या हल्लेखोरांना न्यायालयाने ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ३ मार्चला रात्री पावणे अकराच्या सुमारास या तिघांनी पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून कोराणे यांना गंभीर जखमी केले होते. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत