
आरोग्यासाठी एकवटली अवघी नारीशक्ती
05770
इचलकरंजी : १) महिलांनी पारंपारिक साडी परिधान करून रनरागिणी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
05769
२) केवळ महिलांच्या मॅरेथॉनला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
-----------------------
आरोग्यासाठी एकवटली अवघी नारीशक्ती
इचलकरंजीत रणरागिणीतर्फे मॅरेथॉन; ४५० हून अधिक महिला सहभागी
इचलकरंजी, ता. ७ : रनरागिणी मॅरेथॉनमुळे वस्त्रनगरीतील महिलांना एक नवी ऊर्जा मिळाली. महिला दिनाचे औचित्य साधून केवळ महिलांच्या या रनरागिणी मॅरेथॉनला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या मॅरेथॉनमध्ये ४५० हून अधिक अबाल-वृद्धा सहभागी झाल्या होत्या.
लायन्स क्लब आणि महापालिकेतर्फे आयोजन केले. महिलांना एकत्र येण्याची, सक्षम होण्याची संधी मिळावी आणि आरोग्यासाठी शहरातील अवघी नारीशक्ती एकवटली होती. अनेक महिलांनी सामाजिक संदेश दिला.
येथील लायन्स क्लब आणि महापालिकेतर्फे यावर्षी प्रथमच महिला दिनाचे औचित्य साधून केवळ महिलांसाठी रनरागिणी मॅरेथॉनचे आयोजन केले. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा तीन गटात स्पर्धा झाल्या. उद्घाटन शिवाजीनगरच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक उर्मिला खोत यांनी केले. निलम लोंढे-पाटील, विजय राठी, विलास शहा, महेंद्र बालर, कनकश्री भट्टड यांची प्रमुख उपस्थिती होती. लायन्स क्लबपासून सुरु झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अनेकांनी पारंपारीक साडी परिधान करून सामाजिक संदेशही दिला.
मॅरेथॉनच्या मार्गावर लायन्स क्लब आणि रिंगण फौंडेशनतर्फे ठिकठिकाणी पाणी आणि एनर्जी ड्रिंकची सुविधा केली होती. मॅरेथॉनमध्ये ४५० हून अधिक अबाल-वृद्ध सहभागी झाले होते. यामध्ये आई - मुलगी, सासू- सून, बहीण- बहीण अशा अनेक जोड्या धावताना दिसल्या. निश्चित अंतर पूर्ण करून आलेल्या स्पर्धकांना लायन्स क्लब येथे सहभागी झाल्याबद्दल मेडल देऊन सन्मानित केले. यानिमित्त इचलकरंजीकर मविहिला जगताचा लोकजागर पाहायला मिळाला. मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी सुभाष तोष्णीवाल, संदिप सुतार, कांता बालर, मोना पाटणी, श्रद्धा सातपुते यांनी परिश्रम घेतले.
--------
चौकट
मराठमोळ्या लुकने जोश
अनेक महिला पारंपारीक साडी परिधान करून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या. सामाजिक संदेश तर दिलाच तर काहिंनी जय शिवाजी-जय भवानी यासारख्या घोषणा देत स्पर्धकांमध्ये नवा जोष निर्माण केला. ‘एक धाव स्त्री सन्मानासाठी’ तसेच ‘बेटी बचाओ’चा संदेश जनमानसात देण्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह रणरागिणींची वेशभूषा केली होती..