
राजनंदिनी आमनेचे यश
ich81.jpg
87617
इचलकरंजी : राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल राजनंदिनी आमने हिचा सत्कार केला.
राजनंदिनी आमनेचे यश
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची खेळाडू राजनंदिनी आमने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले. पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशाबद्दल तिचा संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे, प्रसाद कुलकर्णी इंडस्ट्रियल चेअरमन राहुल खंजीरे यांच्याहस्ते सत्कार केला. तिला मुख्याध्यापक एस. ए. पाटील, क्रीडा शिक्षक पी. बी. कोळी आदींचे मार्गदर्शन लाभले.
-----
ich82.jpg
87618
इचलकरंजी : कर्णबधिरांच्या जिल्ह्यास्तरीय विज्ञान मेळाव्यात रोटरी डेफ स्कूल तिळवणीने यश मिळवले.
‘रोटरी डेफ’ चा प्रकल्प प्रथम
इचलकरंजी : कर्णबधिरांच्या पहिल्या जिल्ह्यास्तरीय विज्ञान मेळाव्यात रोटरी डेफ स्कूल तिळवणीने यश मिळवले. कागल येथील राजे दिलीपसिंह ज. घाटगे स्मृती निवासी कर्णबधिर विद्यालयामार्फत कर्णबधिर शाळांतील विद्यार्थ्यांचा पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा झाला. पाचवी ते सातवी या गटामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या पर्यावरणीय चिंता या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांनी प्रकल्पाची माहिती सांकेतिक भाषा व तक्त्याच्या आधारे सांगितली. विद्यार्थ्याना मुख्याध्यापिका सौ स्मिता रणदिवे, विशेष शिक्षक अभिनंदन देशमुख , विश्वराध्य होनमुर्गीकर, सौ. रूपाली सलगर, संतोष गांगोडे आदींचे मार्गदर्शन केले.
-----
ich83.jpg
87619
इचलकरंजी : दोस्ती सर्कल तर्फे प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा झाल्या.
क्रिकेटमध्ये अरिहंत सुपर किंग विजेता
इचलकरंजी : दोस्ती सर्कल प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाल्या. स्पर्धेत अरिहंत सुपर किंग संघ विजेता तर आर. एस. स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला.आणि तृतीय व्ही. एस. वॉरियर्स ठरला. सर्वोत्कृष्ट खेळाडू शुभम चव्हाण, बेस्ट बॅट्समन रोहन कुंभार, बेस्ट बॉलर म्हणून सौरभ कुंभार यांना सन्मानित केले. स्पर्धेचे उद्घाटन सुनील देवर्डे यांच्याहस्ते झाले. आठ संघ आणि ८८ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय चव्हाण, दिनेश साळुंखे, ओंकार सुर्वे, सुजय शेळके, उदय देवर्ड, बसवराज आमाशे आदिंनी परिश्रम घेतले.
-----
त्रैभाषिक कवी संमेलन उद्या
इचलकरंजी : शहरात प्रथमच त्रैभाषिक कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. इचलकरंजी महानगरपालिका, श्री. दगडुलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी, रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह, मनोरंजन मंडळ, क्रिडाई इचलकरंजी, उर्दू साहित्य ॲकॅडमी ॲन्ड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संमेलन शुक्रवारी (ता. १० ) सायंकाळी सहा वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात होणार आहे. कवी आणि सिनेकलाकार किशोर कदम (सौमित्र), आंतरराष्ट्रीय उर्दू गझलकार (कानपूर) शबीना अदीब, राजेश रेड्डी (मुंबई), सलीम चौहान (यवतमाळ), हास्यकवी मोनज मद्रासी (अमरावती), कवयित्री, गायिका आणि अभिनेत्री गौरी पाटील, प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजी), इरफान शाहनुरी हे सहभागी होतील. प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते आणि महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या उपस्थितीत होणार आहे.
----------
05779
श्रद्धा चावरे
श्रद्धा चावरे हिची निवड
इचलकरंजी : राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी योग प्रशिक्षक श्रद्धा चावरे हिची महाराष्ट्र संघाच्या महिला प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत जोधपूर राजस्थान येथे होणाऱ्या तिसऱ्या सीनिअर राष्ट्रीय योगासन व पहिल्या मास्टर्स योगासन स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे. स्पर्धा १९ ते २१ मार्चदरम्यान होणार आहेत. श्रद्धा चावरे ही व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कबनूर येथे योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. स्पर्धेसाठी मनन कासलीवाल व ओम वरदाई या खेळाडूंची निवड झाली आहे.