इचलकरंजीत महिला कर्तृत्वाचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत महिला कर्तृत्वाचा जागर
इचलकरंजीत महिला कर्तृत्वाचा जागर

इचलकरंजीत महिला कर्तृत्वाचा जागर

sakal_logo
By

05783
इचलकरंजी : गंगामाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला शिक्षिकांनी लेझिम खेळत सवाद्य मिरवणुकीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
-----------
इचलकरंजीत महिला कर्तृत्वाचा जागर
विविध स्पर्धांबरोबरच वादविवाद, चर्चासत्र, व्याख्यानांचे आयोजन
इचलकरंजी, ता. ८ : शहर व परिसरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या थिमनुसार महिला कर्तृत्वाचा जागर करत विविध उपक्रम झाले. निबंध, वक्तृत्व स्पर्धा यांसह वादविवाद, चर्चासत्र, आरोग्य तपासणी, व्याख्यानांचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. आजच्या दिवशी स्त्रियांचा सन्मान राखत तिच्या आरोग्याची, आवडी निवडीची आणि मतांची काळजी घेण्यात आली.

* गंगामाई हायस्कूल
विद्यार्थिनींनी सक्षम नारी बनण्याची शपथ दिली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर होत्या. गंगामाई लेझिम पथकासह सवाद्य मिरवणुकीने प्रमुख पाहुण्यांचे प्रशालेत भव्य स्वागत करण्यात आले. नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी प्रशालेतील महिला शिक्षिका व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे आदी उपस्थित होते.

* आप, रयत सोशल फाउंडेशन
विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील तीस वर्षे कार्यरत असणाऱ्या डॉ. आरती कोळी, शैक्षणिक क्षेत्रातील प्रा. डॉ. वर्षा शिंदे, इचलकरंजी पोलिस ठाण्यातील महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. अभिषेक पाटील, राम शिंगाडे, लक्ष्मण पारसे आदी उपस्थित होते.

* चौगुले प्राथमिक विद्या मंदिर
माता पालकांची भव्य रॅली संस्थेचे सेकेटरी तीर्थकर माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रतिभा बावचे यांच्या हस्ते कांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन झाले. खजिनदार रवींद्र पाटील यांच्या ‘सुशिल फार्मा एल. एल. पी’ला सकाळ समूहातर्फे ब्रॅंड ऑफ सिटी म्हणून गौरवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

*शहर काँग्रेस कमिटी
कुरुहीन शेट्टी भवन येथे महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, स्पॉट, फनी गेम स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत इचलकरंजी शहर परिसरातील महिलांनी सहभाग घेतला. कार्याध्यक्षा बिस्मिल्लाह गैबाण, शहर महिला उपाध्यक्ष अनिता बिडकर, सावित्री हजारे उपस्थित होत्या.

*कन्या महाविद्यालय व समाजवादी प्रबोधिनी
येथे हातकणंगले तालुका महिला बालविकास अधिकारी सुजाता शिंदे प्रमुख पाहुण्या होत्या. ‘स्त्री : अबला नाही, तर सबला काल, आज, उद्या’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. श्वेता भोंगाळे या विद्यार्थिनीचा कन्या सुकन्या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा आणि संविधान गुणगौरव परीक्षेत यशस्वी झालेल्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

*व्यंकटराव हायस्कूल
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्नेहा मराठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींनी लक्ष वेधून घेतले. मुख्याध्यापक ए. ए. खोत, उपमुख्याध्यापिका ए. एम. कांबळे, पर्यवेक्षक एम. एस. खराडे, कार्याध्यक्ष जे. ए. कोळी आदी उपस्थित होते.

*इंग्लिश मीडियम स्कूल
प्रमुख पाहुण्या सुषमा दातार यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. शाळेतील महिला अध्यापिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दातार यांनी महिला सबलीकरणाचे महत्त्व व वाचनाचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापिका सौ. भारती कासार अध्यक्षस्थानी होत्या.

*गोविंदराव हायस्कूल
स्त्रीने वृक्षाप्रमाणे उमलून इतरांची सावली बनावे, असे मार्गदर्शन पद्मजा चंगेडिया यांनी केले. संस्थेचे माजी चेअरमन हरिष बोहरा यांच्या पत्नी श्रीमती सोनल बोहरा यांची मदनलाल बोहरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुप्रिया बोहरा यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध कर्तबगार महिलांच्या व्यक्तिरेखा वेशभूषांसह सादर केल्या.

*नवचैतन्य बालगृह
बालगृहाच्या अध्यक्षा अश्विनी कोळेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सौरभ आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले.
------------------
*डांगे महाविद्यालय
कबनूर ः महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आत्मविश्वासाने लढले पाहिजे, असे प्रतिपादन ॲड. दिलशाद मुजावर यांनी केले. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई होत्या. यावेळी भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्राचार्या डॉ. योजना जुगळे, हिराताई मुसाई यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका पल्लवी मेंगणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिन झाला. सुजाता पुजारी, मनीषा मुधोळे, जयश्री चोपडे, अंजना मुधोळे, माधुरी पुजारी, मुस्तफा शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
---------------
*चावराई माध्यमिक विद्यालय
घुणकी : चावरे (ता. हातकणंगले) येथील चावराई माध्यमिक विद्यालयात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. मुख्याध्यापक संजय पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व आणि तो साजरा करण्याचा हेतू सांगितला. शिवांशी प्रतीक पाटील हिचा पहिला वाढदिवस असल्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्ताने तिच्या पालकांनी शाळेला पुस्तके देऊन मुलांना खाऊचे वाटप केले. सर्व शिक्षिका व मुलींचा सत्कार केला. वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या श्रुती पाटील, पूर्वा निकम, समृद्धी निकम, पूर्वा पाटील यांना बक्षीस दिले. सहभागी विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्या. केडीसीसी बॅँकेचे निवृत्त अधिकारी भगवान पाटील, प्रतीक पाटील, ‘सकाळ’चे समीर सय्यद, ॲग्रोवनचे विशाल जाधव, ए. व्ही. वळगड्डे, जे. एस. कुंभार आदी उपस्थित होते.
----------------
पोदार इंटरनॅशनल स्कूल
विद्यार्थिनी सिद्धी भंडारे हिने स्त्रीच्या विविध रुपांची आठवण करून दिली. अध्यक्षस्थानी प्राचार्य ईश्वर पाटील होते. काही विद्यार्थिनींनी स्वरक्षणासाठी घेतलेल्या मार्शल आर्ट प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. महिला शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

*वर्चस्व युवा फौंडेशन
स्त्री शक्तीच्या सन्मानाचा आणि गौरवाचा दिवस म्हणून विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक, आरोग्य, प्रशासन, पोलिस आदी क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला. राजेश राठोड, सुनील मांडवकर, उत्तम चौगुले आदी उपस्थित होते.
--------------------
एकता महिला ग्रुप
कुरुंदवाड ः येथील एकता महिला ग्रुपतर्फे महिला दिन उत्साहात साजरा झाला. ग्रुपच्या महिलांनी कोल्हापुरी फेटे घालून छत्रपती शिवरायांच्या शिवतीर्थवरील पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. ज्येष्ठ सदस्या जयश्री शुक्ल यांनी जागतिक महिला दिनाबद्दल माहिती दिली. महिलांनी घोसरवाड येथील जानकी वृध्दाश्रमात जाऊन तेथील वृध्दांसाठी अन्नदान करीत त्यांच्याशी संवाद साधला. वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी महिलांचे स्वागत करीत अन्नदानाबद्दल आभार मानले.
---------------------

चौकट
जयसिंगपूरला सांस्कृतिक कार्यक्रम
जयसिंगपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व आरोग्याविषयी जागृतीसाठी आरोग्य शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद मिळाला. यावेळी बचत गटांच्या विविध वस्तू व पदार्थांचे प्रदर्शनही भरवले होते. महिलांसाठी आरोग्य शिबिर झाले. मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी, माजी नगराध्यक्षा स्वरुपा पाटील-यड्रावकर, डॉ. नीता माने, प्रेमला मुरगुंडे आदी उपस्थित होते. नृत्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या.
--------
साजणीत कर्ज धनादेश वाटप
रुकडी : साजणी (ता. हातकणंगले) येथे जागतिक महिला दिनानिमित्त अभिषेक सहकारी दूध व्यावसायिक संस्थेतर्फे महिलांना अल्प व्याज दराच्या कर्जाचे धनादेशाचे वाटप केले. महिला स्वयंरोजगार व सबलीकरणासाठी संस्थेचे चेअरमन के. डी. पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप झाले.
चेअरमन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वंदना पाटील, वंदना अंकले, वैशाली पाटील, मिनाक्षी कुंभोजे, शोभा पाटील सोसायटीचे संचालक बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.