लिंबूच्या दरात शेकडा २०० रुपयांनी वाढ

लिंबूच्या दरात शेकडा २०० रुपयांनी वाढ

05789
इचलकरंजी : लिंबूची आवक कमी झाल्याने दरात वाढ होत आहे.
-------------
लिंबूच्या दरात शेकडा २०० रुपयांनी वाढ
फुलांचे दर चढेच; कलिंगड, अननस या हंगामी फळांना डिमांड
इचलकरंजी, ता. ९ : कर्नाटक सीमाभागातून भाजीपाल्याचा लोंढा अजून कमी झालेला नाही. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालावर परिणाम होत आहे. आठवडा बाजारादिवशी मात्र दर फारच पडत असून इतर दिवशी भाजीपाल्याला जेमतेम दर मिळत आहे. लिंबूची आवक कमी भासू लागली आहे. या आठवड्यात दरात प्रतिशेकडा सुमारे २०० रुपयांची वाढ झाली आहे. पोत्यामागे १५०० ते २००० रुपये जादा मोजावे लागत आहेत. आल्याचे भाव आता वधारत आहेत, तर चांगल्या दर्जेदार आल्याला अधिक डिमांड येऊ लागले आहे.
लग्नसराई सुरू झाल्याने फुलांना भाव चढला आहे. फुलांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल उजाडेपर्यंत दर वाढतच राहतील. फळ बाजारात फळांची आवक आणि दर रुळावर नाहीत. कलिंगड, अननस या हंगामी फळांनी चांगले डिमांड घेतले आहे. या हंगामात आवकेवर काहीसा परिणाम झाला आहे. हापूस आंब्याची आवकही वाढत असली तरी येत्या काही दिवसांत ती वाढण्याची शक्यता आहे.
प्रति किलो रुपये भाज्यांचे दर : टोमॅटो- २० ते २५, दोडका- ५० ते ६०, वांगी- ३० ते ४०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -५० ते ६०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी-१५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा -१०-१२, पांढरा कांदा-३०, लसूण- ८० ते १००, आले- ६० ते ८०, लिंबू- ४०० ते ८०० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- ४० ते ५०, ओला वाटाणा -३० ते ४०, चवळी शेंगा - ७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, गवार- ६० ते ८०, रताळे - ३० ते ४०, दुधी -३० ते ४०, पालेभाज्या ८ ते १० रुपये, शेवगा ५ रुपये नग.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी -१२५ ते १३०, शेंगतेल - १७५ ते १८०, सोयाबीन - १३० ते १३५, पामतेल - ११० ते ११५, सूर्यफूल -१३० ते १३५.
- - --- - - -
फुले : झेंडू - ६० ते ८०, निशिगंध- १३०, गुलाब - १०० ते २००, गलांडा- ५० ते ६०, शेवंती- १०० ते १२०, आष्टर - १५० ते १६०.
- - - -- - -
फळे : सफरचंद- १८० ते २००, संत्री - १०० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १०० ते १५०, चिकू- ८० ते १२०, पेरू-३० ते १००, खजूर - १५० ते २००, द्राक्षे - ८० ते १००, कलिंगड -५६ ते ६०, पपई- ३० ते ५०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, केळी- ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी -१०० ते १२०, स्ट्रॉबेरी-५० ते ६० (लहान बॉक्स), चिंच-१०० ते १४०.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ४८, बार्शी शाळू- ४० ते ५०, गहू- २८ ते ३५, हरभराडाळ - ५८ ते ६३, तूरडाळ- १०८ ते ११५, मूगडाळ-९५ ते १००, मसूरडाळ- ७६ ते ७८, उडीदडाळ- ९० ते १००, हरभरा- ५२ ते ५६, मूग-८५ ते ९३, मटकी- १३० ते १३५, मसूर- ७०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ७५ ते ८३, हिरवा वाटाणा- ५५, छोला -१२५ ते १४०.
---------------
बीट, कोबीची आवक सर्वाधिक
बाजार समितीत बीट, कोबीची आवक सर्वाधिक आहे. कधी न होणारी बीटची आवक यंदा अधिक आहे. माल देखणा असून घाऊक बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे; मात्र किरकोळ बाजारात दर टिकून आहेत. आवक चांगली असून भाव कमी मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com