ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन
ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

sakal_logo
By

ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन
इचलकरंजी : रोटरी व प्रोबस क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. १९ मार्चला सकाळी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात हे संमेलन होणार आहे. संमेलनात श्रेष्ठ व प्रतिभावंत अशा वक्त्यांचे विचार, मार्गदर्शन तसेच आनंदी व सुखी जीवनाचा मार्ग आदी विषयावर व्याख्याने व चर्चासत्र होणार आहे. श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल अँड रिसर्च फाउंडेशनला सर्वांगीण समाजसेवा कार्यासाठी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अरुण भंडारे, गिर्यारोहक कस्तुरी सावेकर, साखर शाळेसाठी काम करणारे विनायक गद्रे यांचाही सन्मान होणार आहे. इच्छुकांनी नावे श्रीमती सोनिदेवी रामबिलास बाहेती सेवा केंद्र दाते मळा येथे नोंद करावीत, असे आवाहन केले आहे.
-------
ब्रेन प्रोग्रामिंग कार्यशाळा
इचलकरंजी : डीकेटीईच्या इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ब्रेन प्रोग्रामिंग कार्यशाळा झाली. आठवीच्या विद्यार्थी पालकांसाठी नववी ते बारावीचा टप्पा समजून घेताना या विषयावर कविता नेर्लेकर यांनी मार्गदर्शन केले. मुलांच्या किशोरवयीन टप्प्यामध्ये होणारे बदल, तसेच पालक विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद, पालकांच्या मुलांकडून असणाऱ्या अपेक्षा, त्यासाठी मुलांवर दिला जाणारा अतिरिक्त ताण आणि त्याचे दुष्परिणाम यावर पालकांचे समुपदेशन केले. जगण्याचा मंत्र, विचारांची सकारात्मकता अशा विषयांवर अनेक उदाहरणातून पालकांना जागृत केले. पालकांची गटचर्चा घेऊन पाल्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली. मुख्याध्यापिका श्रीमती उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले.
------
रक्तदान शिबिर रविवारी
इचलकरंजी : गो संवर्धनी अग्निहोत्र ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर होणार आहे. रविवारी (ता. १२) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. मोहनलीला गोशाळा श्रीरामनगर तीन बत्ती चार रस्ता येथे शिबिर होईल. सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सायंकाळी ६ ते ७ यावेळेत अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक हे केले जाणार आहे.
------