खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

05792
इचलकरंजी : गुजरी कॉर्नर चौकातील रस्त्यावर मोठे खड्डे आहेत.

------------
खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
इचलकरंजीतील गुजरी कॉर्नर चौकात नऊ इंचापेक्षा खोल खड्डे
इचलकरंजी, ता. ९ : येथील गुजरी कॉर्नर चौकातील रस्ते झाले मात्र खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाले. येथे मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना वाहन काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे साधारण नऊ इंचांपेक्षा जास्त खोल आणि तीन ते पाच फूट रुंद आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये वाहने अक्षरश: आपटत आहेत. शहरातील रस्ते विकासामुळे वाहनधारक सुखावले असले तरी या खड्ड्यांमुळे फार वैतागले आहेत.
शहरात बऱ्याच वर्षांनंतर रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यात राजवाडा चौक ते नदीवी चौक या रस्त्याचाही समावेश होता. या मार्गावर गुजरी कॉर्नर चौकातून जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरण केले. महापालिकेने पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण केले. परंतु डांबरीकरणाच्या कामात लिकेज झाल्यास त्यांचा ठावठिकाणा लागावा म्हणून ठिकठिकाणी खड्डे कायम ठेवण्यात आले आहेत. आता हेच खड्डे धोकादायक ठरत आहेत. वर्ष उलटले तरी याकडे दुर्लक्ष झाले असून दररोज अपघाताचे चित्र चौकात नित्याचे झाले आहे.
चौकातील ठराविक अंतरावर येणारे आणि एकाच ठिकाणी असणारे हे खड्डे धोकादायक ठरू लागले आहेत. त्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्री या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे. विशेष म्हणजे हे खड्डे ठराविक अंतरावर तसेच एकाच ठिकाणी आहेत. बऱ्याच वेळा रस्ता चांगला दिसत असल्याने वाहनचालक वेगाने वाहन चालवतात. मात्र, अचानक खड्डा समोर दिसल्यामुळे जोराने ब्रेक दाबतात किंवा खड्ड्यातून गाडी नेतात. त्यामुळे अपघात होत आहेत. कर्नाटक राज्याला जोडणारा शहरातून जाणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे त्यावरील खड्ड्यांची समस्या सोडवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
-------------
लिकेजवर कायमस्वरूपी तोडगा
गुजरी कॉर्नर मार्गावर ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी लिकेजचा प्रश्न रेंगाळत आहे. वारंवार लिकेज होत असल्यामुळे खड्डे खणले जात आहेत. त्यामुळे खड्ड्यांचा आकार वाढतच आहे. लिकेज झाल्यास तात्पुरती डागडुजी केली जाते. नागरिकांची सुरक्षा जपत महापालिकेने लिकेजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी आणि खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची गरज आहे.
-------
गुजरी कॉर्नर चौकातच चहाची टपरी आहे. वर्षभर खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडे मागणी करत आहे. अधिकाऱ्यांना सांगूनही दुर्लक्ष केले जाते. खड्ड्यांमुळे दररोज होणारे अपघात बघत आहे. महापालिकेने त्वरित खड्डे आणि वारंवार होणाऱ्या लिकेजचा प्रश्न मार्गी लावावा.
-महादेव नागुरे, चहा टपरीवाले
----------
पाणीपुरवठा विभागाकडून लिकेजचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवले नाहीत. पाणीपुरवठ्याचे लिकेजचे काम पूर्ण झाल्यानंतरच या ठिकाणी खड्डे बुजवून रस्ता नव्याने करण्यात येईल.
राजेंद्र गवळी, बांधकाम शाखा अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com