विद्यार्थ्याला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्याला मारहाण
विद्यार्थ्याला मारहाण

विद्यार्थ्याला मारहाण

sakal_logo
By

चार जणांकडून विद्यार्थ्याला
डोक्यात दगड मारून मारहाण
---
मुलीकडे पाहण्याच्‍या कारणावरून शिवीगाळ
इचलकरंजी, ता. ९ : मुलीकडे पाहण्याच्या कारणावरून चार जणांनी एका विद्यार्थ्याला डोक्यात दगड मारून बेदम मारहाण केली. मारहाणीत रिहान इस्माईल तांबोळी (वय १८, रा. कोरोची, ता. हातकणंगले) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी स्वप्नील परीट, प्रेम यांच्यासह दोन साथीदारांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना डेक्कन रोडवर घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः जखमी रिहान तांबोळी हा क्लासहून सायकलने घरी जात होता. या वेळी तू कुठल्या मुलीकडे पाहतोस, असे म्हणून प्रेम याने त्याला शिवीगाळ केली. यानंतर रिहान याने घाबरून भावाला बोलावून घेतले. प्रेम यानेही फोन करून चार साथीदारांना बोलावले. दोघांमध्ये वाद मिटवत असताना रिहानच्या भावाला चार जणांनी ढकलून दिले. रिहानला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत रस्त्यावर पडलेला दगड हातात घेऊन डोक्यात गंभीर इजा केली. तसेच, भागात दिसलास तर जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी रिहान तांबोळीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संशयित चार जण फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.