पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस वृत्त
पोलीस वृत्त

पोलीस वृत्त

sakal_logo
By

इचलकरंजीत नदीत बुडणाऱ्या युवकाला जीवदान

इचलकरंजी : येथे पंचगंगा नदीत पाय घसरून पडलेल्या युवकाला वाचविण्यात यश आले. पंचगंगा जलतरण मंडळाचे दररोज सकाळी पोहायला येणारे प्रकाश सटाले, अनिल शहापुरे, विजय पलमरे व श्री. पालकर यांनी या तरुणाला पाण्यात बुडण्यापासून वाचवले. रविवारी(ता.१२) सकाळी पोहत असताना या सर्वांना एक तरुण पाण्यात गटांगळ्या खाताना दिसला. यावेळी जलतरण मंडळाच्या सदस्यांनी त्वरित बुडत्या तरुणाचा जीव वाचविला आणि बाहेर काढले. नदीकिनारी आल्यावर पाय घसरुन पाण्यात पडल्याचे व पोहायला येत नसल्याचे या तरुणाने सांगितले.
------

इचलकरंजीत हुल्लडबाजांवर कारवाई

इचलकरंजी : रंगपंचमीला शहरात हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिस दलाने कारवाई केली. शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांनी एकूण ४७ वाहनांवर कारवाई करत एकूण २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. शिवाजीनगर पोलिसांनी एकूण १८ वाहनांवर ११ हजार पाचशे रुपयांचा दंड, गावभाग पोलिसांनी १२ वाहनांवर सुमारे आठ हजार रुपये, तर शहापूर पिलीस ठाण्याने १७ वाहनांवर ४ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. अशाप्रकारे शहरात रंगपंचमीचा बेरंग करत कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या वाहनधारकांना लगाम घातला.
----