दुकानाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुकानाला आग
दुकानाला आग

दुकानाला आग

sakal_logo
By

05818
इचलकरंजी : भाग्यरेखा टॉकीजसमोरील मुख्य मार्गावरील शेगडी रिपेरअरीच्या दुकानाला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाले.
...

शेगडी रिपेअरीच्या दुकानाला
इचलकरंजीत आग

सात लाखांचे नुकसानः शेगडी, गॅस गिझर, मिक्सरसह अन्य साहित्य जळून खाक

इचलकरंजी, ता.१२ : रंगपंचमीची धामधूम सुरू असताना येथील भाग्यरेखा टॉकीजसमोरील मुख्य मार्गावरील शेगडी रिपेअरीच्या दुकानाला आग लागली. शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील शेगडी, रिपेअरीला आलेले कुकर, गॅस गिझर, मिक्सर असे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत सुमारे ७ लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहरातील भाग्यरेखा टॉकीजसमोर व्यंकटेश एंटरप्राईजेस हे गॅस शेगडी, कुकर रिपेअरीचे दुकान आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दुकान मालक सुरज कांबळे यांनी दुकान बंद ठेवले होते. भरवस्तीलगत असणाऱ्या या दुकानाला आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. दुकानातून धुराचे व आगीचे लोट येत असल्याचे पाहताच नागरिकांनी व पेट्रोलिंग करणाऱ्या शिवाजीनगर पोलिस आग विझवण्यासाठी धावले.
घटनास्थळी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दुकानावर पाण्याचा मारा करत सुमारे एक तासाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत दुकानातील गॅस शेगड्या, कुकर, गॅस गिझर, मिक्सर अशा नवीन व जुन्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या. मुख्य मार्गालगत आगीची घटना घडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. बंद दुकानातील जळलेले सर्व साहित्य नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.