
चोरटा अटक
5820
इचलकरंजी : दोन मोटारसायकलींसह चोरट्याला शहापूर पोलिसांनी अटक केली.
...
शहापूर पोलिसांकडून
मोटारसायकल चोरटा जेरबंद
इचलकरंजी, ता.१२ : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील यात्रेतून दोन मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला मोटारसायकलसह शहापूर पोलिसांनी अटक केली. श्रीधर सुनिल कोळी (वय २२, रा. वसगडे, ता. करवीर) असे संशयिताचे नाव आहे. पेट्रोलिंग करीत असताना संशयावरून त्याच्याकडे चौकशी केली असता कोळी याने चोरीची कबुली दिली.
शनिवारी (ता.११) तारदाळ नाका परिसरात शहापूर पोलिस पेट्रोलिंग करीत होते. विनानंबरप्लेट मोटारसायकल घेवून जाताना एक तरुण निदर्शनास आला. त्याच्याकडे कागदपत्रांची तपासणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपास केल्यानंतर संशयित कोळी याने तीन मार्चला तारदाळ यात्रेतून दोन मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.