कन्या महाविद्यालयात कार्यशाळा

कन्या महाविद्यालयात कार्यशाळा

05827
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात ‘नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत आर. जी. कोरबू यांनी मार्गदर्शन केले.

कन्या महाविद्यालयात कार्यशाळा
इचलकरंजी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात ‘नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे आयोजन करण्यात आले. प्रथम सत्रात आर. जी. कोरबू यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थिनींसाठी कसे फायदेशीर आहे, याबाबत विवेचन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. प्रकाश कुंभार यांनी नवीन शैक्षणिक धोरण प्राध्यापकांसाठी आव्हानात्मक असून, यात टिकून राहण्यासाठी प्राध्यापकाने गुणवत्ता, बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून सिद्ध करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. त्रिशला कदम अध्यक्षस्थानी होत्या. कार्यशाळेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सन्मवयक प्रा. सुधाकर इंडी, प्रा. सोमनाथ गायकवाड यांनी परिश्रम घेतले. प्रा. वर्षा पोतदार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. संपदा टिपकुर्ले व प्रा. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किरण कानडे यांनी आभार मानले.
---------
05826
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात लेखिका ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन डीकेटीई सोसायटीच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्या हस्ते झाले.

‘डीकेएएससी’मध्ये लेखिका ग्रंथप्रदर्शन
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात इंग्रजी विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला लेखिका ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले. डीकेटीई सोसायटीच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्या हस्ते याचे उद्‍घाटन झाले. प्राचार्य डॉ. अनिल पाटील, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सुनीता वेल्हाळ, हिंदी विभागप्रमुख डॉ. अंजली उबाळे उपस्थित होते. महिला लेखिका ग्रंथप्रदर्शन उपक्रमाचे कौतुक केले. प्रा. डॉ. डी. जी. घोडके, डॉ. प्रभावती पाटील, ग्रंथपाल व्ही. पी. यादव आदी उपस्थित होते. प्रा. दीपक देवकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संदीप हरगाणे यांनी आभार मानले.
------
अल्फोन्सा स्कूलचे यश
इचलकरंजी : मिशन ऑलिम्पिक स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत अल्फोन्सा स्कूलमधील दोन बहिणींनी उल्लेखनीय यश मिळविले. खोपोली, मुंबई येथे स्पर्धा मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेट अफेर्स गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया पुरस्कृत झाल्या. जीया स्वामी हिने रिक्रिएशनल इनलाईन या विभागात ६०० मीटर व ८०० मीटरमध्ये रौप्यपदक प्राप्त केले. नक्षत्रा स्वामी हिने ‘प्रोफेशनल इनलाइन’ या विभागान ४०० व ६०० मीटरमध्ये कांस्यपदक प्राप्त केले. त्यांना तेजस पाटील, अजित मलरावाडकर, प्राचार्य कादर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
-----
न्यू हायस्कूलमध्ये ‘जागर संविधानाचा’
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘जागर संविधानाचा’ हा कार्यक्रम झाला. हर्ष जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मानवी हक्क व मानव विकास याबाबत सुरू असणाऱ्या त्यांच्या अजीम प्रेमजी संस्थेच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. लोकराजा शाहू संविधान संवादाचे कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी संविधानाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला. संविधानाचे महत्त्व सांगणारा स्वरचित पोवाडा त्यांनी सादर केला. राजवैभव शोभा रामचंद्र, दामोदर कोळी, रेश्मा खाडे उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. ए. पाटील अध्यक्षस्थानी होते.
---
आदर्श विद्यामंदिरमध्ये फेस पेंटिंग
इचलकरंजी : आदर्श विद्यामंदिरात रंगपंचमी अनोख्या प्रकारे साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी फेस पेंटिंग उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी चेहऱ्यावर फुलपाखरे, तिरंग्यातील रंग, इंद्रधनुष्यातील सात रंग, विविध प्राणी स्पायडरमॅन, झाडे आदी फेस पेंटिंग केली. संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश मर्दा, मुख्याध्यापिका गीता खोचरे, सुनीता आलुगडे, सरस्वती सावंत, ज्योती पाटील, दीप्ती भोसेकर उपस्थित होते.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com