घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी
घरफोडी

घरफोडी

sakal_logo
By

5831
इचलकरंजी : येथील जवाहरनगर भागातील बंद घरातील तीन तिजोऱ्या फोडून चोरट्यांनी साडेपंधरा तोळे सोन्यासह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल पळविला.
......

इचलकरंजीत सात लाखांची घरफोडी

तीन तिजोऱ्या फोडून १५ तोळे सोन्यावर डल्ला; चोरटा सीसीटीव्हीत कैद

इचलकरंजी, ता.१३ : जवाहरनगर भागातील बंद घर फोडून साडेपंधरा तोळे सोन्यासह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. कुलूप तोडून घरातील तब्बल तीन तिजोऱ्या फोडून चोरट्याने ही चोरी केली. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. याबाबतची फिर्याद मीना बाजीराव मिसाळ (वय ५३) यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिली आहे. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी मीना मिसाळ जवाहरनगर भागातील आंबेडकर सोसायटीमध्ये राहतात. शनिवारी (ता.११) त्या सहकुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. आठवडी बाजाराच्या मुख्य मार्गावर त्यांचे घर आहे. दोन दिवस घराला कुलूप असल्याची संधी चोरट्याने साधली. चोरट्याने घराचे कुलूप तोडून कडी- कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तेथील पहिल्या खोलीतील तिजोरी फोडली. मात्र, हाती काहीच न लागल्याने साहित्याची नासधूस करत आतील खोलीतील दोन तिजोऱ्या फोडल्या. तिजोरीतील साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले. दोन्ही तिजोऱ्यांच्या लॉकरवर लोखंडी गजासारख्या वस्तूने घाव करीत त्या फोडल्या आणि यातील सुमारे सात लाखांचा मुद्देमाल लांबविला.
चोरीत सोन्याचे कानातील बिल्वर, राणीहार, लक्ष्मीहार, वेल, टॉप्स, अंगठ्या, चेन, साखळीचे गंठण असे एकूण साडेपंधरा तोळे दागिने, तसेच चांदीचे पैंजण आणि रोख वीस हजार रुपये अशा मुद्देमालावर डल्ला मारला. आज पहाटे तीनच्या सुमारास बाहेरगावाहून मिसाळ कुटुंबीय घरी परतल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले.
------
दोन्ही ठिकाणी चोरटा एकच?

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर नाक्यावर झालेल्या घरफोडीतील चोरट्याचे ठसे आणि चोरीची पद्धत याचा पोलिसांनी सूक्ष्म अभ्यास केला आहे. जवाहरनगरमध्ये झालेल्या घरफोडीतील चोरट्याचे ठसे आणि आजच्या चोरीच्या पद्धतीत साधर्म्य असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
...