सुधारित गोदाम आग

सुधारित गोदाम आग

05837
इचलकरंजी : कबनूर - चंदूर रोडवरील गोदामाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले.
...

भंगाराच्या गोदामाला
शॉर्टसर्किटने आग

आठ लाखांचे नुकसान; इचलकरंजीतील घटना

इचलकरंजी, ता.१३ : कबनूर-चंदूर रोडवरील भंगार गोदाम वसाहतीमध्ये शॉर्टसर्किटने अचानक आग लागल्याची घटना घडली. आग वेळीच आटोक्यात आल्याने एकच गोदाम जळून खाक झाले. गोदामात जळाऊ भंगार असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. गोदामातील प्लास्टिक टाक्या, जुन्या वाहनांचे व मशीनचे पार्ट असे भंगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. १३ हून अधिक अग्निशामक बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणले. मात्र, संपूर्ण आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः येथील कबनूर ओढ्यानजीक भंगाराची गोदामे आहेत. आज रात्री साडेसातच्या सुमारास समीर सनदी यांच्या रस्त्याकडेला असणाऱ्या गोदामाला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने भागातील नागरिक आणि भंगार व्यावसायिकांची तारांबळ उडाली. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. विविध ठिकाणांवरून अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. जवळच नागरी वस्ती असल्यामुळे अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर वेळीच नियंत्रण आणले.
अग्निशमन दलाच्या १३ हून अधिक बंबांनी पाण्याचा फवारा केला तरी आग पूर्णतः विझलेली नव्हती. आगीमुळे धुराचे लोटच्या लोट हवेत पसरले. एकीकडे आगीचे पसरणारे लोळ थांबवून दुसरीकडे आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. आगीचे लोळ दूर अंतरावरूनही दिसत होते. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस दाखल झाले. आगीत गोदामातील प्लास्टिक टाक्या, मशीन व वाहनांचे जुने पार्ट असे एकूण सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com