
‘रोटरी’तर्फे महिलांसाठी परिसंवाद
ich141.jpg
88991
इचलकरंजी : रोटरी क्लब येथे आयोजित महिलांसाठी परिसंवादात रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते.
-------------
‘रोटरी’तर्फे महिलांसाठी परिसंवाद
इचलकरंजी, ता. १४ : रोटरी क्लब येथे ‘चला अर्थ साक्षर होवूया’ या विषयावर महिलांसाठी परिसंवाद झाला. माय फाउंडेशन, सीए शाखा यांच्या सहकार्याने परिसंवादाचे आयोजन केले होते.
रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, सचिव प्रकाश गौड, सीए शाखेचे अध्यक्ष शेहेनशाह मुजावर, माय फाउंडेशनचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसंवादात सीए प्रीती डाया व शेतामाला मालानी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक घरच्या व समाजाच्या जडणघडणीत आणि विकासात घरातील गृहिणींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या संचय प्रवृत्तीमुळे घर समृद्ध होते. काळाच्या अनुषंगाने पारंपरिक पद्धती सोडून डिजिटल साक्षर असणे आणि आर्थिक घडामोडींची माहिती असणे आता अत्यंत आवश्यक आहे. बँकेचे प्रत्येक व्यवहार, अर्थाजन, बचतीची क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी, आपत्कालीन परिस्थितीत असणारे महत्त्वाचे आर्थिक निर्णय याबाबत परिसंवादात मार्गदर्शन केले. वसंत पाटील, चंद्रकांत मगदूम, रविकांत भगवत आदी उपस्थित होते.