कबनूर येथे ९१ हजारांचे मद्य जप्त

कबनूर येथे ९१ हजारांचे मद्य जप्त

कबनूर येथे ९१ हजारांचे मद्य जप्त
इचलकरंजी, ता.१६ : कबनूर उरुसात बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या नाष्टा सेंटरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली. कारवाईत देशी व विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण ९१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अशोक देवाप्पा पिंपळे, सतीश देवाप्पा पिंपळे (दोघेही रा. परीट गल्ली, कबनूर), विशाल विजयकुमार विधानी (रा. मॉडर्न हायस्कूलजवळ) व आकाश महादेव रायबागे (रा. विक्रमनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामध्ये नाष्टा सेंटरमालक व एका वाईन शॉप व देशी दारू दुकानमालकाचा समावेश आहे. ही कारवाई कबनूर येथील चक दे नाष्टा सेंटर येथे केली. कबनूर येथे उरुसाच्या पार्श्वभूमीवर गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादक शुल्कच्या भरारी पथकाला बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चक दे नाष्टा सेंटर येथे पथकाने छापा टाकून चौघांना त्याब्यात घेतले. त्यांच्याकडून ९९६ देशी दारूच्या व ४५१ विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण ९१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com