तरुण आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुण आत्महत्या
तरुण आत्महत्या

तरुण आत्महत्या

sakal_logo
By

इचलकरंजीत तिसऱ्या मजल्यावरून
उडी टाकून तरुणाची आत्महत्या

इचलकरंजी, ता.१६ : शॉपिंग सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावरून एका तरुणाने उडी टाकून आत्महत्या केली. बाजूच्याच छत्रपती शिवाजी उद्यानात खाली पडल्याने मोठा आवाज आला. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी १०८ रुगणवाहिकेतून जखमी तरुणाला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नव्हती. घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील प्रमुख मार्गावरील मलाबादे चौकात महापालिकेच्या मालकीची शॉपिंग सेंटरची इमारत आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे इमारतीच्या तिसऱ्या‍ मजल्यावरुन एका तरुणाने उडी मारली. इमारतीच्या बाजूलाच असणाऱ्या छत्रपती शिवाजी उद्यानात तो पडल्याने मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून महापालिका कर्मचाऱ्यां‍नी याठिकाणी धाव घेतली. त्वरित १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून गंभीर जखमी झालेल्या तरुणाला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत युवक हा २१ वर्षाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. शॉपिंग सेंटरवरती तिसऱ्या मजल्यावर मृत तरुणाचे चप्पल आढळून आले आहे. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.