
डीकेएएसी’मध्ये भरड धान्य वर्ष
ich193.jpg
90003
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त भित्तिपत्रिका प्रदर्शन आयोजित केले.
‘डीकेएएसी’मध्ये भरड धान्य वर्ष
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले. यानिमित्त वनस्पतिशास्त्र विभागाने भरड धान्य आणि त्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने भित्तिपत्रिका प्रदर्शन व व्याख्यान आयोजित केले. प्रा. डी. ए. यादव यांनी मनोगत व्यक्त केले. गणित विभागप्रमुख प्रा. मुंगारे, प्रा. डॉ. सुतार आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. गाणबावले यांची प्रमुख उपस्थिती होती. वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. टी. इंगळे यांनी बदलती जीवनशैली, त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि भरड धान्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. आम्रपाली कट्टी यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा पाटील हिने आभार मानले. प्रा. भारती दोपारे, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. लीना खाडे, डॉ. संदीप गावडे, प्रा. आरती खोत, प्रा. ऊर्मिला चौगुले आणि डॉ. उदयसिंह देसाई आदी उपस्थित होते.
-------------------
ich192.jpg
90002
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी पूनम भुयेकर यांनी मार्गदर्शन केले.
कन्या महाविद्यालयात मोडी लिपी वर्ग
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले. मोडीलिपी अभ्यासक सौ. पूनम भुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मोडी लिपीमध्ये करिअरच्या विविध संधी आहेत. अजूनही लाखो कागदपत्रे मोडी लिपी लिप्यांतरअभावी प्रकाशात आली नाहीत. ती कागदपत्रे प्रकाशात येणे ही काळाची गरज आहे, असे मत सौ. भूयेकर यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम होत्या. इतिहासप्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. राजश्री मालेकर यांनी आभार मानले. रत्नावली पाच्छापुरे, साधना गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. मृणाल देगावकर, महेश कोष्टी यांसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
------
‘डीकेएएससी’च्या खेळाडूंची निवड
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयाच्या खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. पंजाब युनिव्हर्सिटी (परियाला) येथे होणाऱ्या ऑल इंडिया आंतरविद्यापीठ कयाकिंग व कनोईंग स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. पुरुष संघात करण घुणके, पवन कोळी, कौस्तुभ पोकार्डे, दर्शन पवार, तसेच महिला संघात पिया चव्हाण यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेत वरील खेळाडूंनी कयाकिंग आणि कनोईंग सर्धेत के-१, के-२ व सी -१, सी- २ या प्रकारात यश मिळवले. खेळाडूंचा प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते सत्कार केला. जिमखाना विभागप्रमुख प्रा. मेजर एम. जे. वीरकर, प्रा. मुझफ्फर लगीवाले, प्रा. प्रशांत कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभले.