
कैकाडी समाज मेळावा
05891
इचलकरंजी : कैकाडी समाज संघाच्या मेळाव्यात आमदार यशवंत माने यांनी मार्गदर्शन केले.
...
इचलकरंजीत कैकाडी समाज संघाचा मेळावा
इचलकरंजी : ‘समाजाच्या क्षेत्रीय बंधनाच्या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी समाज परिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून आवाज उठवावा लागणार आहे. राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये क्षेत्रीय बंधनाचा ठराव संमत करून राज्यपालांची स्वाक्षरी घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाकडे दिल्लीकडे हा प्रस्ताव पाठवला असून काही तांत्रिक बाबी पूर्ण करून क्षेत्रीय बंधन मार्गी लागेल’, असा विश्वास मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा युवक कैकाडी (कोरवी) समाज संघाच्यावतीने आयोजित समाज मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. माजी पोलिस उपाधीक्षक रघुनाथराव जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. राज्याध्यक्ष लालासाहेब जाधव,कार्याध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा मुद्रांक अधिकारी मल्लीकार्जुन माने, डॉ. तानाजी जाधव, स्वरुपानंद गायकवाड, राज्य सचिव जयशंकर माने, स्वरूपचंद गायकवाड, सतीश माने, डॉ.आर.बी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विजयकुमार माने स्वागत केले. सुधाकर कोरवी यांनी आभार मानले. अंकुश माने, विनोद कोरवी यांनी सूत्रसंचालन केले.