मोटारसायकल चोरीप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

मोटारसायकल चोरीप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

मोटारसायकल चोरीप्रकरणी
दोघांना पोलिस कोठडी
इचलकरंजी, ता. २० : गांधीनगर येथील दोघा तरुणांकडून शहापूर पोलिसांनी चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. याप्रकरणी भैया ऊर्फ प्रथमेश लक्ष्मण कानाडे (वय २१), गौतम जितेंद्र नायकवडे (२१, दोघेही रा. गांधीनगर ता. करवीर) यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पोलिस कोठडी सुनावली. तारदाळ येथील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी हा गुन्हे उजेडात आणला. या कारवाईत त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार रुपयांच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या. चौकशीत दोघांनी तारदाळसह तामगाव, कळंबा, उचगाव येथून चार मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मोटारसायकली चोरी करताना वापरलेल्या दोन मोपेडसह सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com