इचलकरंजीत ट्रकच्या धडकेत परप्रांतीय कामगार जागीच ठार

इचलकरंजीत ट्रकच्या धडकेत परप्रांतीय कामगार जागीच ठार

इचलकरंजीत ट्रकच्या धडकेत
परप्रांतीय कामगार जागीच ठार

ट्रक ताब्यात; चालकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२४ : ट्रकच्या धडकेत परप्रांतीय कामगार जागीच ठार झाला. सलीम (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. ट्रकमधून गॅस सिलिंडरची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ट्रकचालक सागर सावंता माळी (वय ३४, रा. शिरोळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघात गुरुवारी (ता.२३) मध्यरात्रीच्या सुमारास किसान चौक परिसरात घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः येथील एका यंत्रमाग कारखान्यात सलीम अधूनमधून गुंडीबंडीचे काम करत होते, तर शिरोळ येथील सागर माळी हा गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर चालक म्हणून काम करतो. माळी गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास किसान चौकातून चंदूर ओढ्याच्या दिशेने गॅस सिलिंडरच्या गोदामाकडे ट्रक ( एम.एच. ०९ ईएम ५६७६) घेऊन जात होता. यावेळी तेथून चालत जात असलेल्या सलीम यांना ट्रकची धडक बसल्याने ते रस्त्यावर कोसळले. कानातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अरुण जेडी यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चालक सागर माळी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
.......................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com