
राज्य कुस्ती स्पर्धा
5901
इचलकरंजी : येथे शनिवारपासून सुरू झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विविध वजनी गटात चटकदार कुस्त्या झाल्या.
हरिष शेलार, खतीनसह
सावंतची विजयी सलामी
कुमार महाराष्ट्र केसरी कुस्तीला प्रारंभ
इचलकरंजी, ता. २५ : येथे आजपासून सुरू झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मटी (अरावती), शुभम सावंत (सोलापूर), ओंकार मडतारे (सातारा), मसात पठाण (औरंगाबाद), तुषार बचाची (जळगाव), हरिष शेलार (कोल्हापूर), वैभव खतीन (परभणी), विश्वजित जेदे (लातूर) आदींनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयी सलामी दिली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने १७ वर्षांखालील वजनी गटातील ही स्पर्धा आहे. वस्त्रनगरीत या स्पर्धेचे उद्घाटन पै. पृथ्वीराज महाडिक, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीवीर परिषदेचे सरचिटणीस बाबासाहेब लांडगे, परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, परिषदेचे उपाध्यक्ष संभाजी वरुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. इचलकरंजीने सातत्याने कुस्तीला प्रोत्साहन दिले आहे. यातून चांगले कुस्तीगीर घडल्याचे कौतुकाद्गार हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी काढले. उद्घाटनानंतर व्यंकोबा मैदान व स्पर्धा डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या मॅटवर विविध वजनी गटातील कुस्त्यांनी प्रेक्षकांची माने जिंकली. स्पर्धेत ११ वजनी गटातील तब्बल ४५ जिल्ह्यांतील सुमारे ५५० हून अधिक पैलवान सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी स्पर्धा पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.