‘डीकेएएससी’मध्ये पोस्टर प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डीकेएएससी’मध्ये पोस्टर प्रदर्शन
‘डीकेएएससी’मध्ये पोस्टर प्रदर्शन

‘डीकेएएससी’मध्ये पोस्टर प्रदर्शन

sakal_logo
By

ich261.jpg
91424
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन झाले.

‘डीकेएएससी’मध्ये पोस्टर प्रदर्शन
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन झाले. महिला वनस्पतीशास्त्रज्ञ विषयावरील या प्रदर्शनाचे उद्‍घाटन प्रमुख पाहुण्या डॉ. सुनिता वेल्हाळ यांनी केले. उपप्राचार्य प्रा. डी. ए. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागप्रमुख डॉ. एस. टी. इंगळे यांनी विविध क्षेत्रात कार्यरत महिला वनस्पतीशास्त्रज्ञांबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वनस्पती शास्त्रात योगदान देणाऱ्या जगभरातील महिलांचे कार्य प्रदर्शनातून मांडले. सूत्रसंचालन राजनंदिनी माने यांनी केले. गायत्री साळुंखे हिने आभार मानले. सौ. बी. एस. दोपारे, डॉ. यु.ए.देसाई, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. आम्रपाली कट्टी, प्रा.आरती खोत, डॉ.वर्षा दवंडे, डॉ. संदीप गावडे, डॉ. लीना खाडे आदी उपस्थित होते.
-----
ich262.jpg
91425
इचलकरंजी : महानगरपालिकेतर्फे आयोजीत स्पर्धांमध्ये मालती माने विद्यालयाने यश प्राप्त केले.
मालती माने विद्यालयाचे यश
इचलकरंजी : माझी वसुंधरा २.० अभियानातील स्पर्धांमध्ये मालती माने विद्यालयाने यश प्राप्त केले. महानगरपालिकेतर्फे विविध स्पर्धा घेतल्या. समर्थ ढवळे याने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, श्रुती सुतार हिने चित्रकला स्पर्धेत प्रथम तर सई रुकडे हिने रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने यांच्यहस्ते सत्कार केला. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय रेंदाळकर, वर्गशिक्षक रेखा पाटील, कलाशिक्षक अंजना शिंदे आदिंचे मार्गदर्शन लाभले.
----
ich263.jpg
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात इंग्रजी कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिके देवून सन्मान केला.
कन्या महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा
इचलकरंजी : श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात इंग्रजीमधून कथाकथन स्पर्धा झाल्या. विद्यार्थिनींची इंग्रजी या विषयाची असणारी भीती कमी होऊन जास्तीत जास्त वाचन व लेखन व्हावे या हेतूने इंग्रजी विभागातर्फे स्पर्धेचे आयोजन केले. अनेक विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या विषयावर कथा सादर केल्या. स्पर्धेत अपूर्वा घोलकर हिने प्रथम, तेजश्री शिंदे हिने द्वितीय तर प्रियांका सागर व सायली माने यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक निकिता पाटणकर हिला दिले. विजेत्यांना प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्याहस्ते पारितोषिके दिली. परीक्षक म्हणून डॉ. प्रभा पाटील व प्रा. संदीप हारगाणे यांनी काम पाहिले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. दीपक सरनोबत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रामेश्वरी कुदळे यांनी केले. आभार प्रा. संदीप पाटील यांनी मानले.
------
आत्मदर्शन शिबीर मंगळवारपासून
इचलकरंजी : येथील मधुयोग अकॅडमी व आत्मदर्शन परिवारातर्फे आत्मदर्शन शिबीर झाले. ते मंगळवार (ता. २८) ते ९ एप्रिलदरम्यान पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात होणार आहे. मंगळवारी (ता.२८) सायंकाळी सहा वाजता शिबिराची माहिती व परिचय देण्यात येणार आहे. त्यांनतर ९ एप्रिलपर्यंत सकाळी ६ ते ९ या वेळेत योगगुरू संजीव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिरात सकस आहार, योग, ध्यान, प्राणायाम, आसने यासोबतच भारतीय संस्कृती व परंपरा याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सविता मकोटे, आण्णासाहेब शहापूरे, सुरेश पाडळे, प्रशांत गलगले, शिवनारायण उंटवाल, कृष्णा मुंदडा, प्रकाश रावळ, अलोक केसरे यांनी केले आहे.
----
दशरथ मोहिते यांचा सत्कार
इचलकरंजी : कामगार कृती समितीतर्फे दशरथ मोहिते यांचा सत्कार केला. मर्चंट को - ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मोहिते यांचा सत्कार झाला. मोहिते यांच्या रिक्षा संघटनांपासून यंत्रमाग कामगार चळवळ ते सहकार क्षेत्रापर्यंतचा मागोवा शामराव कुलकर्णी यांनी मनोगतातून घेतला. अध्यक्षस्थानी भरमा कांबळे होते. प्रास्ताविक बापू घुले यांनी केले. आभार बंडोपंत सातपुते यांनी मानले. राजू निकम, मदन मुरगुडे, सुभाष कांबळे, रंगराव बोंद्रे, महेश लोहार, शिवाजी साळुंखे आदी उपस्थित होते.