
दिव्यांग आयुक्त देशमुख यांची रोटरी डेफ स्कूलला भेट
05918
इचलकरंजी : रोटरी डेफ स्कूलला राज्याचे दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी भेट दिली.
दिव्यांग आयुक्त देशमुख
यांची रोटरी डेफ स्कूलला भेट
इचलकरंजी : रोटरी डेफ स्कूल तिळवणीला राज्याचे दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी भेट दिली. त्यांनी शाळेची पाहणी करून सुरू असणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. कौशल्यविकसित व्यवसायाभिमुख उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. स्वागत मुख्याध्यापिका सौ. स्मिता रणदिवे यांनी केले.यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, श्रीमती साधना कांबळे, डी.एम. कस्तुरे आदी उपस्थित होते.
----------
निवृत्तीनिमित्त भाऊसो गुंजेकर यांचा सत्कार
इचलकरंजी : रोटरी डेफ स्कूल तिळवणीचे कर्मचारी भाऊसो गुंजेकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या पत्नी भारती गुंजेकर यांचा मुख्याध्यापिका स्मिता रणदिवे यांनी सत्कार केला. गुंजेकर कुटुंबियांकडून विद्यार्थ्याना खाऊचे वाटप केले. रुपाली सलगर, विश्वराध्य होनमुर्गीकर व गणपती घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. गुंजेकर यांनीही भावना व्यक्त केल्या. सुत्रसंचालन संतोष गांगोडे व साईन सुहास गायकवाड यांनी केले. आभार अमृता पाटील यांनी मानले.
-------
व्यंकटेश कॉलनीमध्ये व्याख्यान
इचलकरंजी : येथील व्यंकटेश कॉलनीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्याख्यानाचे आयोजन केले आहे. २ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता डॉ. दिलीप पटवर्धन यांचे शरीर साक्षात परमेश्वर या विषयावर व्याख्यान होणार आहे. पतंजली योगपीठ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यंकटेश कॉलनी, विठ्ठल रुक्मिणी योगसाधना वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.