शफीक मुल्ला याचा सत्कार

शफीक मुल्ला याचा सत्कार

05925
इचलकरंजी : आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवा स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल शफीक मुल्ला याचा सत्कार करण्यात आला.
शफीक मुल्ला याचा सत्कार
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयातील शफीक मुल्ला याने आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवा स्पर्धेत यश मिळवले. सांस्कृतिक विभागाअंतर्गत बेंगलोर येथील जैन विद्यापीठ येथे आंतर विद्यापीठीय राष्ट्रीय युवा स्पर्धेसाठी त्याची विद्यापीठ संघातून निवड झाली होती. ‘कव्वाली (महफिल-ए-खास) व दिंडी’ या स्पर्धेमध्ये त्याने सहभाग घेतला होता. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. आदिवासी लोकनृत्य, पाश्चिमात्य समूहगीतामध्ये तीन सुवर्ण व तर लोकसंगीत वाद्यवृंद या कलाप्रकारामध्ये कास्यपदकाची कमाई केली. यशाबद्दल त्याचा प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने आणि उप-प्राचार्य डॉ. एन. एम. मुजावर यांच्याहस्ते सत्कार केला. त्याला सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. एस. एच. आंबवडे, प्रा. एस. टी. बिरंजे, डॉ. जरंडीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
------
05926
इचलकरंजी :डीकेएएससी कॉलेजमध्ये बेस्ट फ्रॉम वेस्ट प्रदर्शन झाले.
डीकेएएससी कॉलेजमध्ये प्रदर्शन
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये बेस्ट फ्रॉम वेस्ट प्रदर्शन झाले. वनस्पतीशास्त्र विभागाच्या पुढाकाराने प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ साधने बनवली. उपप्राचार्य प्रा. डि. ए. यादव यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. रुपाली सांभारे व प्रा. भारती कोळेकर उपस्थित होत्या. डॉ. एस. टी. इंगळे यांनी टाकाऊपासून टिकाऊबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अभिलाषा कोरे यांनी केले. सूत्रसंचालन राजनंदिनी माने यांनी केले. आभार गायत्री साळुंखे यांनी मानले. भारती दोपारे, डॉ. मधुमती शिंदे, डॉ. आम्रपाली कट्टी, डॉ. संदीप गावडे, डॉ. उदयसिंह देसाई, प्रा. आरती खोत, उर्मिला चौगुले, डॉ. वर्षा दवंडे, डॉ. लीना खाडे, डॉ. संदीप गावडे, भारत देसाई आदी उपस्थित होते.
-------
सत्संग महोत्सवाचे आयोजन
इचलकरंजी : श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळातर्फे अकराव्या वर्धापन दिनानिमित्त सत्संग महोत्सवाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. ३०) ते ८ एप्रिल या काळात विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळच्या सत्रात काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजन, हरी जगर तर सायंकाळी प्रवचन, हरिपाठ व किर्तन होईल. दरम्यान ७ एप्रिलला दिपोत्सव व रंगावली महोत्सवही होणार आहे. ८ एप्रिलला काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
-----
रक्तदान शिबीर उद्या
इचलकरंजी : रामनवमी व महावीर जयंतीनिमित्त लायन्स ब्लड बँक दाते मळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, रोटरी क्लब अतिग्रे आणि चौगुले स्वीट मार्ट अँड डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी ९ ते १२ या वेळेत शिबीर होणार आहे. रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
-------
इचलकरंजी : हनुमान जयंतीनिमित्त श्री पंचमुखी हनुमान भक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान अभिषेक, महाआरती, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ६ एप्रिलला सकाळी ६ वाजता श्रींचा जन्मकाळ व सकाळी अकरा वाजता महाप्रसाद होऊन जयंती कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com