खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खून
खून

खून

sakal_logo
By

5932- तेजस डांगरे
5933
इचलकरंजी : येथील यड्राव फाटा चौकात मंगळवारी रात्री तरुणाचा खून करण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी केलेला पंचनामा.

इचलकरंजीत मित्राचा खून
यड्राव फाट्यावर पूर्ववैमनस्यातून प्रकार
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२८ : भररस्त्यात पूर्ववैमनस्यातून काही तरुणांनी एका मित्राचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला. तेजस विजय डांगरे (वय २१ रा.अण्णा रामगोंडा शाळेजवळ, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. घेतलेले पैसे परत देतो, असे सांगत या मित्रांनी त्याला बोलावून घेत आणि खून केला. शहापूर यात्रेच्या धामधुमीत यड्राव फाटा(ता.शिरोळ) चौकात हा प्रकार आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. मुख्य हल्लेखोरासह अन्य एकाचे नाव नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार शिवाजीनगर व शहापूर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः इचलकरंजीत राहणाऱ्या तेजस डांगरे याचा चंदूर येथील शाहूनगर व यड्राव फाट्यावर पानपट्टी व्यवसाय आहे. हल्लेखोर व डांगरे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात वारंवार आर्थिक देवाण-घेवाण होत होती. त्यांच्यामध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होता. अनेक वेळा दोन्ही कुटुंबातील नातेवाइकांनी त्यांच्या वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. आज रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून संशयित हल्लेखोर यड्राव फाट्यावर आले. त्यांनी डांगरे याला फोन करून पैसे परत देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. डांगरे पैसे घेण्यासाठी पानपट्टीतून यड्राव फाटा चौकात येताच हल्लेखोरांनी शिवीगाळ करत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही मित्रांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्लेखोरांपैकी एकाने हातातील धारदार शस्त्राने डांगरे यां डोक्यात खोलवर वार केला. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन डांगरे जमिनीवर कोसळला आणि हल्लेखोर पसार झाले. डांगरेला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात मोठा जमाव जमल्याने तणावाचे वातावरण बनले होते. डांगरे याच्या मित्रांनी हल्ला नेमका कोणी केला, याची माहिती पोलिसांना दिली.

सकाळी वाद अन् रात्री खून
हल्लेखोर व तेजस डांगरे यांच्यातील वाद काही केल्या संपत नव्हता. आज सकाळच्या सुमारास डांगरे हल्लेखोराच्या गल्लीतील गेला होता. यामुळे पुन्हा वादाचे पडसाद उमटले. तोच रात्री हल्लेखोराने साथीदारासह तेजसचा खून केला.

संशयितांच्या घरावर दगडफेक
दरम्यान, संशयितांच्या घरावर दगडफेकीचा प्रकार घडल्याने तणावाचे वातावरण बनले होते. त्यामुळे या घरासह आयजीएम रुग्णालयात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहापूर यात्रेच्या धामधुमीत खून प्रकरणाने शहापूर पोलिसांची तारांबळ उडाली.
---------