Tue, June 6, 2023

पोलीस संचलन
पोलीस संचलन
Published on : 29 March 2023, 6:04 am
इचलकरंजीत पोलिस दलाचे पथसंचलन
इचलकरंजी : रामनवमी व महावीर जयंती उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी शहर पोलिस दलाने शहरातून पथसंचलन केले. प्रमुख मार्गांवरून शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी रूट मार्चचे आयोजन केले होते. निरीक्षक सत्यवान हाके, राजू ताशीलदार यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थपासून संचलनाला सुरूवात झाली. प्रमुख मार्गांवरून संचलन करण्यात आले. मलाबादे चौक मार्गे महात्मा गांधी पुतळा चौकात संचलनाचा समारोप झाला. संचलनात सहा पोलिस अधिकारी, ७० हून अधिक महिला-पुरूष पोलिस, तसेच गृहरक्षक दलाचे जवान, स्ट्रायकिंग फोर्स सहभागी झाले होते.