राम जन्मला गं सखे....

राम जन्मला गं सखे....

ich303.jpg
92447
इचलकरंजी : रामनवमीनिमित्त गावभाग येथील राममंदिरात सजवलेली श्रीरामाची मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात जन्मोत्सव सोहळ्यासाठी महिलांची गर्दी झाली.
------------
राम जन्मला गं सखे....
इचलकरंजी परिसरात रामनवमी उत्साहात; मंदिरात भाविकांची वर्दळ
इचलकरंजी, ता. ३० : राम जन्मला गं सखे राम जन्मला.. सीयावर रामचंद्र की जय… असा जयघोष करत शहरात रामनवमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजविलेल्या विविध श्रीराम मंदिरांचा परिसर श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमदून गेला. कीर्तन, भजन आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भारावले. शहराच्या विविध भागांतील मंदिरांमध्ये रामजन्म उत्साहात साजरा केला. काही प्रमुख राममंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची दिवसभर वर्दळ सुरू होती.
शहरात गुढीपाडव्यापासून प्रारंभ झालेल्या रामाच्या नवरात्रानिमित्त नऊ दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या नवरात्राची सांगता रामजन्माने झाली. आज दुपारी बारा वाजता पाळणा हलला आणि रामनामाचा एकच जयघोष झाला. जन्मोत्सवानिमित्त श्रीरामाची मूर्ती, गाभारा, सभामंडप आणि मंदिराचा परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवला होता.
रामभक्तांनी फुलांची उधळण करीत या सोहळ्यात सहभाग घेतला. रामजन्मानंतर अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादाचे वाटप केले. रामनवमीनिमित्त मंदिरांनाही फुलांची, विद्युत माळांची सजावट, तसेच फळांची आरास केली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढत श्रीरामांची प्रतिकृती उभारली होती. मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांग लावली होती. कीर्तन, प्रवचन आणि जन्मोत्सवाचा सोहळा भावपूर्ण वातावरणात झाला. सुंटवड्याचा प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता केली. जन्मोत्सवावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. शहरात भगवे ध्वज घेऊन काही कार्यकर्त्यांनी श्रीरामाचा जयघोष करत वाहन फेरी आणि मिरवणूकही काढली.
------
नृसिंहवाडी ः येथील दत्त मंदिरानजीकच्या राम मंदिरात रामनवमीनिमित्त दुपारी श्री राम जन्मकाळ सोहळा उत्साहात झाला. गुरुपुष्यमृत व रामनवमीच्या योगावर अनेक भाविकांनी दत्त दर्शनासाठी गर्दी केली. मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व पूजा झाल्यावर सकाळी अकरा वाजता दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण झाले. बारा वाजता जन्मकाळ सोहळा झाला. भाविकांनी अबीर, गुलाल व फुलांची चांदीच्या पाळण्यावर उधळण केली. महिलांनी रामांच्या पाळण्याची पूजा व आरती करून पाळणा जोजाविला. भाविकांना सुंठवडा प्रसादाचे वाटप करणेत आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com