
खूनी हल्ला अटक
युवतीवर खुनी हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक
इचलकरंजी, ता.१ : युवतीवर खुनी हल्ला करणाऱ्या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. स्वप्निल विष्णुदास पाटील (वय ३७, रा. अवधूत आखाडा) असे त्याचे नाव आहे. प्रेमसंबंध सुरु ठेवण्यास नकार दिल्याने हल्ला केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी दिली.
शुक्रवारी रात्री घरासमोर तरुणीवर स्वप्नील याने तिच्यावर हल्ला केला होता. कोयत्याने डोक्यात व पाठीवर वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी स्वप्निल याला पोलिसांनी अटक केली. जखमी तरुणी व स्वप्निल यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून कोयत्याने हल्ला केला.या हल्ल्यात तरुणीच्या दोन्ही हाताची बोटे तुटली आहेत.