डीकेएएससी महाविद्यालयात व्यापार महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेएएससी महाविद्यालयात व्यापार महोत्सव
डीकेएएससी महाविद्यालयात व्यापार महोत्सव

डीकेएएससी महाविद्यालयात व्यापार महोत्सव

sakal_logo
By

05971
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात व्यापार महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी सौरभ शेट्टी, प्राचार्य डॉ.अनिल पाटील आदी.

डीकेएएससी महाविद्यालयात व्यापार महोत्सव

इचलकरंजी, ता. २ : महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, आत्मनिर्भरता, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, प्रेरणा, धाडस, तसेच सहनशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने डीकेएएससी महाविद्यालयात व्यापार महोत्सव झाला. कॉमर्स व बी. कॉम. आयटी विभगाच्या विद्यार्थ्यांनी हा व्यावसायिक उपक्रम घेतला. शहराचा सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय विकास कसा साध्य होईल यासाठी उपक्रमाचे आयोजन केले होते.
व्यापार महोत्सवाचे उद्‍घाटन सौरभ शेट्टी यांनी केले. व्यापार महोत्सव या प्रत्यक्ष उपक्रमातून पदवीनंतर नोकरीबद्दल असणारी उदासीनता कमी होणार आहे. यामुळे विद्यार्थी व्यापार, व्यवसाय, उद्योग व नवनिर्मितीकडे आकर्षित होतील आणि त्यांच्यामध्ये मूल्यांची जोपासना व संशोधन वृत्ती वृद्धिंगत होईल, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ अनिल पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी अशा उपक्रमांचा निश्चितच फायदा होणार आहे. नेतृत्व, संभाषण कौशल्य आदी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तसेच अनुभव प्राप्त होतील महाविद्यालयायाने ही अनोखी व प्रेरणादायी संधी उपलब्ध करून दिली आहे.’
व्यापार महोत्सवाध्ये विविध खाद्यपदार्थ, रेडीमेड कपडे, सौंदर्याच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल ॲक्सेसरीज, सेंद्रिय गुळ आदी विविध स्टॉल्स मांडले होते. स्वयंरोजगार , व्यवस्थापन जमाखर्च व हिशेब ठेवणे, स्टॉल मांडणी व व्यवस्थापन तसेच ग्राहकांशी संवाद, संघटन कार्य, सराव आदी कामे विद्यार्थ्यांनी केली. स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. विजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संचित लांडगे, सोनाली पारिख यांनी केले. आभार आय. टी. समन्वयक प्रा. डॉ. आर. एस. रॉड्रिक्स यांनी मानले. प्रा. मृणाली पाटील, प्रा. पल्लवी होगाडे, प्रा. मेघा माने, प्रा. मनोज जाखले यांनी परिश्रम घेतले. सर्वच विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला.