
खुनी हल्ला अटक
खुनी हल्ला प्रकरणी दोघांना अटक
इचलकरंजी, ता.६ : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणातून व्यावसायिकाला चाकूने भोकसणाऱ्या चार जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौघे एकाच गल्लीतील असून, यातील पोलिसांनी आज दोघांना अटक केली. महेश हणमंत घोडके (वय 23) व गुरुराज बसवराज कावली (वय 20 दोघे रा. कृष्णानगर) अशी त्यांची नांवे आहेत, तर शिवा घोडके व रणजित गाडे हे दोघे फरारी आहेत.
डेक्कन चौकात बुधवारी रात्री दुकान बंद करताना आनंदा मस्के (वय 42) याच्यावर अचानकपणे हल्ला झाला. यात चार जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात मस्के गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जलदगतीने तपास केला. घोडके व मस्के यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याबाबत मस्के यांनी घोडके बंधूंच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या रागातून त्यांनी मस्के याच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने खूनी हल्ला केला.