पाणदारे, ठिकणे यांचा सत्कार

पाणदारे, ठिकणे यांचा सत्कार

06078
इचलकरंजी : टागोर वाचनालयाचे विद्यार्थी ओंकार पाणदारे व प्रकाश ठिकणे यांचा सत्कार केला.

पाणदारे, ठिकणे यांचा सत्कार
इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचे विद्यार्थी ओंकार पाणदारे यांची पोलीस अंमलदार व प्रकाश ठिकणे यांची मुंबई रेल्वे पोलिसपदी निवड झाली. ते तीन- चार वर्षापासून टागोर वाचनालयात अभ्यास करत होते. अथक परिश्रमाने त्यांनी हे यश प्राप्त केल्याबद्दल ग्रंथपाल बेबी नदाफ यांच्याहस्ते त्यांचा सत्कार केला.
-----
नाईट कॉलेजमध्ये विविध स्पर्धा
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. भाषा विभाग व स्पर्धा परीक्षा विभागातर्फे विविध स्पर्धा घेतल्या. पहिल्या दिवशी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा चार भाषांमधून निबंध स्पर्धा झाल्या. निबंध स्पर्धेचे उद्‍घाटन प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या उपस्थितीत केले. दुसऱ्या दिवशी चारही भाषांमधून वक्तृत्व स्पर्धा तसेच वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्‍घाटन डॉ. विरुपाक्ष खानाज यांनी केले. डॉ. रामेश्वर सपकाळ, डॉ. गणेश खांडेकर, डॉ. प्रवीण पोवार, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. जीवन पाटील, प्रा. ओंकार कुलकर्णी, प्रा. अभिजित पाटील उपस्थित होते. स्पर्धांचे आयोजन डॉ. माधव मुंडकर, प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. प्रमोद काळे, डॉ. सबिहा सय्यद, डॉ. रविकिरण कोरे, प्रा. स्मिता मंतेरो यांनी केले.
-------
राष्ट्रीय लोकन्यायालय ३० एप्रिलला
इचलकरंजी : येथील जिल्हा न्यायालयातर्फे ३० एप्रिलला राष्ट्रीय लोकन्यायालय होणार आहे. या दिवशी दाखलपूर्व प्रकरणे आणि न्यायालयातील प्रलंबित खटले ठेवण्यात येणार आहेत. लोकन्यायालयामध्ये पक्षकारांमध्ये आपसात तडजोडीने जास्तीत जास्त खटले निकाली निघत असल्याने पक्षकारांचा वेळ, पैशांची बचत होणार आहे. तरी या दिवशी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीसाठी ठेवून लोकअदालत यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com