पोलीस वृत्त

पोलीस वृत्त

इचलकरंजीत एकाची आत्महत्या
इचलकरंजी : एका मुलाने राहत्या घरी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. आंबुल श्रीनिवास यंगल (वय १७ रा. रेणुकानगर झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. रेणुकानगर झोपडपट्टी येथील राहत्या घरात पोटमाळ्याच्या लोखंडी चॅनेलला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद योगेश आंबादास यंगल यांनी दिली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
-----
घरात घुसून मारहाण; आठ जणांवर गुन्‍हा दाखल
इचलकरंजी : घरात घुसून मारहाण करत नुकसान केल्याप्रकरणी आठ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोहित बनसोडे, काजल बनसोडे, सुरेखा बनसोडे, यश बनसोडे, अशोक बनसोडे अनिल बनसोडे, ललिता बनसोडे, आर्यन बनसोडे (सर्व रा. महात्मा गांधी, कुष्ठरोग वसाहत, इचलकरंजी ) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पावलस शंकर लोंढे (वय ७०) यांनी पोलिसांत दिली. पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी सर्व संशयितांनी फिर्यादीला धमकी दिली. शिवीगाळ करत लोंढे यांच्या घराचा दरवाजा फोडून जबरदस्तीने प्रवेश केला.तसेच १५ हजार रुपयांचे नुकसान केले.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com