
डीकेएएससी कॉलेजमध्ये व्याख्यान
06196
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये प्रा. डॉ. धीरज शिंदे यांचे वारसा पर्यटन काळाची गरज याविषयावर व्याख्यान झाले.
डीकेएएससी कॉलेजमध्ये व्याख्यान
इचलकरंजी : डीकेएएससी कॉलेजमध्ये प्रा. डॉ. धीरज शिंदे यांचे वारसा पर्यटन काळाची गरज याविषयावर व्याख्यान झाले. डीकेएएससी कॉलेज व ए. आर. पी. कन्या कॉलेज इतिहास विभागातर्फे आयोजन केले. प्रा. डॉ. शिंदे यांनी पुरातत्व शास्त्र, गाईड, उत्खनन, पर्यटन विकास, हडप्पा संस्कृती आणि सभ्यता, अजंठा वेरूळ लेणी, रायगड किल्ला यासह जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड महालक्ष्मी मंदिर यांचा इतिहास उलगडून दाखवला. परीक्षार्थी होण्याऐवजी ज्ञानार्थी बना, असे त्यांनी सांगितले. स्वागत डॉ अनिल जांभळे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अरुण कटकोळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख ओंकार बेलेकर करून दिली. आभार निकिता हुबळी हिने मानले. प्रा. विशाल गोडबोले यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
-----
06195
इचलकरंजी : रोटरी क्लब व श्री व्यंकटेश महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
रोटरी-व्यंकटेश महाविद्यालयात करार
इचलकरंजी : समाजसेवी संस्था रोटरी क्लब ऑफ अतिग्रे व श्री व्यंकटेश महाविद्यालय यांच्यामध्ये विविध बाबीवर सामंजस्य करार केला. यामध्ये व्यंकटेश महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने व रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्याकडून प्रेसिडेंट यास्मिन मनेर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सोयी-सुविधा कायम पुरवणे, व्यावसायिक अभ्यासक्रम पुरवणे, शास्त्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरवणे, बौद्धिक आणि कलात्मक कौशल्य पुरवणे, करिअर जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे असे अनेक उद्देश समोर ठेवून सामंजस्य करार केला. कराराच्या देवाण-घेवाणप्रंसगी यास्मिन मनेर, ग्रंथपाल एम. पी. केसरकर, प्रा. ए. बी. विभूते उपस्थित होते.
-------
ज्ञानसंस्कार शिबिराचे आयोजन
इचलकरंजी : हुतात्मा बाबूगेनू विद्यामंदिरात मोफत ज्ञानसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. राजहंस फाउंडेशन व विद्यामंदिराच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. ते १ ते ७ मेदरम्यान सायंकाळी पाच वाजता होणार आहे. पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी मोफत असणाऱ्या या ज्ञानसंस्कार शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.