पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

अपघातात जखमीचा मृत्यू

इचलकरंजी : पायी चालत जाणाऱ्या एकाला रिव्हर्स येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिलीप कृष्णा पळसे (वय ५५) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चारचाकी (एम. एच.०९ एफ.बी.४३४६) महिला चालकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित महिला आयजीएम हॉस्पिटलसमोर चारचाकी वाहन बेदरकारपणे रिव्हर्स घेत होती. यावेळी दिलीप पळसे हे पायी चालत जात होते. त्यांना रिव्हर्स येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक देवून गंभीर जखमी केले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमी पळसे यांना उपचाराकरिता दवाखान्यात घेऊन न जाता संबंधित महिला चालक पळून गेली. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
------
पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या साडूला मारहाण

इचलकरंजी : गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या एकाला त्याच्या साडूनेच मारहाण केली. याप्रकरणी स्वप्निल सुनील चौगुले (रा.गुजरी पेठ, इचलकरंजी) याच्यावर गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत अभिषेक आदगोंडा पाटील (वय ३१, रा. सांगली रोड, इचलकरंजी) हे जखमी झाले आहेत. अभिषेक पाटील हे त्यांची पत्नी, मेहुणी व साडू यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गावभाग पोलिस ठाण्यात गेले होते. स्वप्निल चौगुले याने पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या डाव्या कानावर गंभीर इजा झाली. पाटील यांच्या फिर्यादीनुसार स्वप्नील चौगुले याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---