आरोग्य शिबिरास प्रतिसाद

आरोग्य शिबिरास प्रतिसाद

06231
इचलकरंजी : आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिरात आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले.

आरोग्य शिबिरास प्रतिसाद
इचलकरंजी : रोटरी सेवा केंद्र दाते मळा येथे मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर घेतले. रुग्णांचा प्रतिसाद लाभला. येथील रोटरी क्लब, रोटरी अॅन्स व डीएनएम आयुर्वेदिक केअर सेंटर, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर झाले. शिबिरामध्ये रुग्णांची अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत तपासणी केली. औषधे दिली. आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनोज पाटील यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत रुग्णांना मार्गदर्शन केले. आयुर्वेदिक तज्ञ मनीषा पाटील, सुरेश घोडके, संदीप पाटील, गणेश थोरात, स्मिता पवार, विद्या मोरे, सागर चौगुले, सचिन लोंढे यांचे सहकार्य लाभले. रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत यांनी स्वागत केले. रोटरी अॅन्सच्या पुष्पा धूत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अलका रावळ यांनी केले. रोटरी अॅन्सच्या सुरेखा कोथळे, सोनाली कोथळे, सुनीता मगदूम आदी उपस्थित होते.
-----
06232
इचलकरंजी : विधवा प्रथा बंद करण्यात पुढाकार घेतलेल्या हेरवाड ग्रामपंचायतीचे संविधान संवादकांनी कौतुक केले.
हेरवाड ग्रामपंचायतीचे कौतुक
इचलकरंजी : विधवा प्रथा बंद करण्यात पुढाकार घेतलेल्या हेरवाड ग्रामपंचायतीचे संविधान संवादकांनी कौतुक केले. संविधान प्रास्ताविका आणि पुस्तक संच देवून अभिनंदन केले. संविधान संवादक अमोल पाटील यांनी भूमिका मांडली. जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच रेखा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच सचिन पाटील, पल्लवी कोळेकर, सुजाता गुरव, मुक्ता पुजारी, ग्रामपंचायत सदस्य अफसर मकानदार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com