
व्यंकटेश महाविद्यालय- घोडावत विद्यापिठात करार
ich45.jpg
00530
इचलकरंजी : संजय घोडावत विद्यापीठ आणि व्यंकटेश महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार केला.
------------
व्यंकटेश महाविद्यालय- घोडावत विद्यापिठात करार
इचलकरंजी, ता. ५ : व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी आणि संजय घोडावत विद्यापीठामध्ये सामंजस्य करार केला. याद्वारे व्यक्तिमत्व विकास, करिअर विकास, कौशल्य विकास व रोजगारक्षम विद्यार्थी घडवणे यासाठी ई-कॉमर्स आधारित रिसेंट ट्रेंड्स शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने व संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी झाली. करार विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन करिअरसाठी महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी सक्षम बनवणे, त्यांच्यामध्ये शिक्षणासोबतच रोजगार आधारित कौशल्य असणारे शिक्षण प्रदान करण्याचा हेतू आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे चांगले लाभ मिळतील असे मत श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यांनी व्यक्त केले. संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील म्हणाले, ‘शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामंजस्य करारामध्ये उद्दिष्ट ठरवली आहेत. ते उद्देश पूर्ण करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठाकडून आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल.’