खंडणी दोन अटक

खंडणी दोन अटक

६० हजारांची खंडणी मागणाऱ्या
जर्मनी गँगवर पोलिसांची कारवाई

व्यावसायिकाच्या खानदानाला संपवण्याची धमकी

इचलकरंजी, ता.४ : व्यावसायिकाच्या खानदानाला संपवण्याची धमकी देत ६० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या जर्मनी गँगवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. येथील रुपेश नरवाडे, बजरंग फातले, अविनाश जर्मनी यांसह त्यांच्या साथीदारांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यातील रुपेश व बजरंग या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद व्यावसायिक सचिन संभाजी गायकवाड (वय ३३ रा. जवाहरनगर) यांनी पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जवाहर नगर भागात सचिन गायकवाड यांचा स्वराज इंजिनिअरिंग नावाचा मशीन वर्कशॉप व्यवसाय आहे. हा मशीन शॉप सुरू ठेवायचा असेल तर गायकवाड यांच्या खानदानाला संपवण्याची धमकी जर्मनी गँगमधील रुपेश नरवाडे, बजरंग फातले व अविनाश जर्मनी यांनी दिली. २० हजार रोख व मोबाईलसाठी ४० हजार रुपये अशी एकूण ६० हजार रुपयांची खंडणी स्वरूपात पैशांची मागणी केली. फिर्यादी गायकवाड यांचे भाऊ अनिल व सुनील यांना शिवीगाळ केली. सुनील यांच्या कानशिलात मारून कारखाना बंद पाडला आणि आर्थिक नुकसान केले. सचिन गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुपेश नरवाडे व बजरंग फातले या दोघांना अटक केली. यातील मुख्य संशयित अविनाश जर्मनी व त्याचे साथीदार फरार आहेत.

चौकट
पोलिसांचे आवाहन
कोणत्याही व्यापारी अथवा कारखानदार तसेच इतरांना कोणी खंडणी मागत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com