आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या
आत्महत्या

आत्महत्या

sakal_logo
By

06255
...

खोतवाडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

इचलकरंजी : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाने राहत्या घरी तुळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश सुनील खोत (वय २०, रा. मराठी शाळेशेजारी खोतवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला उपचाराकरिता आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.