विकास चौगुले यांना पुरस्कार

विकास चौगुले यांना पुरस्कार

06257
इचलकरंजी : विकास चौगुले यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती ग्लोबल समाजरत्न अवॉर्ड प्रदान केला.
विकास चौगुले यांना पुरस्कार
इचलकरंजी : श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेतर्फे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल विकास विद्यामंदिरचे अध्यक्ष विकास चौगुले यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती ग्लोबल समाजरत्न अवॉर्डने सन्मानित केले. पुरस्कार वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर, मराठी अभिनेत्री मंजुषा खेस्त्री यांच्याहस्ते प्रदान केला. चेतन दळवी, अशोकराव माने, दत्तात्रय देसाई आदी उपस्थित होते.
------------------------
जानकी वृद्धाश्रमास साहित्य
इचलकरंजी : सामाजिक कार्यकर्ते महेश कोरे यांनी मुलगी भक्ती कोरे हिचा वाढदिवस जानकी वृद्धाश्रमात साजरा केला. विविध साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. जमखाना, चादर, शाली, लुंगी असे जीवनावश्यक साहित्य वाटप केले. इंदिरा कोरे, संतोष माळी, नंदू चौधरी, गणेश भोई, शिवाजी भुई, राजू कोरे, संतोष माळी, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
------
गंगामाई विद्यामंदिरचे यश
इचलकरंजी : सौ. गंगामाई विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी विविध बाह्य स्पर्धांमधील स्पर्धेत यश मिळवले. स्केटिंग स्पर्धेत सलोनी पाटील, जलतरण स्पर्धेत अवनी आठवले, जान्हवी आग्रे, बुद्धिबळ स्पर्धेत आराध्य ठाकूर देसाई, आराध्या रुग्गे, धनश्री पोरलेकर, चित्रकला स्पर्धेत सिद्दी बरगाले, राही आमणे यांनी यश मिळवले. सूर्यनमस्कार, योगा, वकृत्व, निबंध, नृत्य, कथाकथन, हस्ताक्षर, काव्यलेखन अशा विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळवले. विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा लक्ष्मीश्वर, उपाध्यक्ष मीना रानडे, मुख्याध्यापिका संध्या सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com