मनोरंजन व्याख्यानमाला रविवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोरंजन व्याख्यानमाला रविवारपासून
मनोरंजन व्याख्यानमाला रविवारपासून

मनोरंजन व्याख्यानमाला रविवारपासून

sakal_logo
By

मनोरंजन व्याख्यानमाला रविवारपासून

इचलकरंजी, ता. ८ : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला हा उपक्रम आयोजित केला आहे. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन व रोटरी क्लब ऑफ सेंट्रलतर्फे आणि श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स व तुळजाराम सराफ यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला होणार आहे. १४ ते २३ मेदरम्यान व्याख्यानमाला येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात दररोज रात्री साडेनऊ वाजता होणार आहे. दहा दिवस विविध क्षेत्रातील, विविध ठिकाणचे मान्यवर वक्ते आणि कलाकार या व्याख्यानमालेत सहभाग घेणार आहेत.
व्याख्यानमालेचे हे ४५ वे वर्ष आहे. उद्‍घाटनादिवशी प्रसिद्ध गायिका व चित्रपट संगीत अभ्यासक प्रा. डॉ. मृदुला दाढे जोशी यांचा अमर लता हा लता मंगेशकर यांची गायकी उलगडणारा कार्यक्रम होणार आहे. त्यांनतर त्यांचाच साहिरनामा हा प्रतिभावंत गीतकार साहिर लुधियानवी यांच्या काव्याचा कार्यक्रम, हवामान बदल आणि विकास या विषयातील युवा अभ्यासक इरा देऊळगावकर (पुणे) यांचे विषमताग्रस्तांचा भारत, प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर (लातूर) यांचे निसर्गकल्लोळ, औषध निर्माणशास्त्र संशोधक व लेखिका प्रा. डॉ. मृदुला बेळे (नाशिक) यांचे औषध न लगे मजला, प्रसिद्ध लेखक, प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ते मनोज अंबिके (पुणे) यांचे कानमंत्र आई बाबा व पालकांसाठी, आयआरएस, आयकर आयुक्त (सवलत) अभिनय कुंभार (पुणे) यांचे अस्वस्थ वर्तमानात आजची युवाशक्ती, कॅन्सर सर्व्हायवर, मिसेस ग्लोबल युनायटेड डॉ. नमिता कोहोक (नाशिक) यांचे सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास या विषयावर व्याख्यान होईल. सुरेश भट गझल मंच पुणे या मराठी गझलक्षेत्रात अकरा वर्षे कार्यरत असलेल्या संस्थेचे सात कवी व गझलकार गझलरंग हा दर्जेदार मराठी गझल मुशायरा सादर करतील. समारोपादिवशी मॅगसेसे पुरस्कार प्राप्त, पर्यावरण तज्ज्ञ आणि भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांचे अमृतवाहिनी नदी - चला नदी वाचवूया या विषयावरील व्याख्यान होईल. व्याख्यानमालेसाठी प्रवेश विनामूल्य असून शहर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.