पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

लैंगिक अत्याचार; एकाला पोलिस कोठडी
इचलकरंजी : चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार करत गर्भवती केल्याप्रकरणी एकाला शहापूर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित महिला व संशयित आरोपी हे नात्याने चुलत भाऊ बहीण आहेत. पीडित महिला माहेरी घरी एकटी असताना संशयिताने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित महिलेला सासरी आल्यानंतर त्रास होऊ लागला. त्यानंतर दवाखान्यात जाऊन तपासणी करण्यात आली. यावेळी पीडित महिला १३ आठवड्याची गरोदर असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले . याबाबत पीडित महिलेने तिच्या मामासह शहापूर पोलिस ठाण्यात हजर राहून माहिती दिली. महिलेच्या फिर्यादीनुसार तिच्या चुलत भावावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटक करून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
----
किरकोळ कारणावरून तरुणाला सळीने मारहाण
इचलकरंजी : किरकोळ कारणावरून चार जणांनी एका तरुणाला सळीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी अभिजीत साखरे यासह चार जणांवर शिवाजीनगर पलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद जखमी कौशल रमेश ठोंबरे (वय 21) याने पोलिसांत दिली आहे. ही घटना तीन बत्ती चार रस्ता चौक नजीक माई बाल विद्या मंदिरच्या मागील बाजूस घडली. कौशल ठोंबरे हा त्यांच्या घराजवळ रामनगर येथील माई बालविद्या मंदिराच्या मागील बाजूस बसला होता. यावेळी अभिजीत साखरे याने कौशलला तू इथे बसायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत जाब विचारला असता साखरे यासह त्याच्या तीन साथीदारांनी कौशलला सळीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात कौशल जखमी झाला. कौशलच्या फिर्यादीनुसार साखरे यासह चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com