पालेभाज्याची आवक वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालेभाज्याची आवक वाढली
पालेभाज्याची आवक वाढली

पालेभाज्याची आवक वाढली

sakal_logo
By

06285
इचलकरंजी : १) गुजरात भागातून दशरी, केसर हापूस आंब्याची आवक जोमात आहे.
06284
२) लेचीचा हंगाम सुरू झाला आहे.
--------------
पालेभाज्यांची आवक वाढली
निशिगंधाचे दर निम्म्यावर; खाद्यतेल बाजारात ग्राहकांसाठी अच्छे दिन
इचलकरंजी, ता. ११ : अवकाळी पावसाने बाजारातील वाढते दर थोडे सुस्थितीत आले आहेत. प्रामुख्याने थांबलेली पालेभाज्यांची आवक वाढली आहे. तसेच ऐन हंगामात फुलांचीही आवक जोमात आहे. निशिगंधाचे दर निम्म्याने उतरले आहेत. आल्याचे भाव कडक स्थितीत, तर लिंबूचे दर थंडगार झाले आहेत. दुसरीकडे खाद्यतेल बाजारात ग्राहकांसाठी अच्छे दिन आले आहेत. सरकारने सूर्यफुलाची आयात वाढवल्याने तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पामतेल टिकून असून अन्य तेलांचे भाव प्रतिकिलो सरासरी ५ ते १० टक्क्यांनी कमी झाले आहेत.
धान्य बाजारात उन्हाळी मुगाची आवक वाढत आहे. यंदा उत्पादन अधिक झाल्याने आवक चांगली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. फळ बाजारात दशरी, केसर हापूस आंबा विक्रीसाठी येत आहेत. गुजरात भागातून होणारी ही मोठी आवक सध्या जोमात आहे. या आंब्यांची बाजारात किलोवर विक्री होत आहे. याचा परिणाम अन्य हापूस आंब्यांवर होताना दिसत आहे. तसेच लेचीचाही हंगाम सुरू झाला आहे. कलिंगडाची आवक कमी झाली आहे. अवकाळी पाऊस पडला की, कलिंगड आवकेला फटका बसतोच. त्यामुळे शहरातील कलिंगडाचे स्टॉल आता हळूहळू बंद होत आहेत.
प्रति किलो रुपये भाज्यांचे दर : टोमॅटो- २० ते २५, दोडका- ५० ते ६०, वांगी- ३० ते ४०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -४० ते ५०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी-१२ ते १५, बटाटा- २५ ते ३०, कांदा -१८ ते २०, पांढरा कांदा-२० ते २५, लसूण- ८० ते १००, आले- २०० ते २२०, लिंबू- २५० ते ५०० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- १४० ते १५०, ओला वाटाणा -३० ते ४०, चवळी शेंगा - ७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, गवार- ६० ते ८०, रताळे - ३० ते ४०, दुधी -३० ते ४०, कोथिंबीर-२५ ते ३०, मेथी - २० ते २५, अन्य पालेभाज्या १२ ते १५ रुपये, शेवगा ३ ते ५ रुपये नग.
- - --- - - -
फुले : झेंडू -५० ते ६०, निशिगंध- ९० ते १००, गुलाब - २०० ते २५०, गलांडा- ७० ते ७०, शेवंती-१०० ते १२०.
- - - -- - -
फळे : सफरचंद- १८० ते २००, संत्री - १०० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १०० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरू-३० ते १००, खजूर - १५० ते २००, द्राक्षे - ६० ते १००, कलिंगड -५५ ते ६०, पपई- ३० ते ५०, खजूर-१२० ते १६०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, केळी- ४० ते ५० डझन, देशी केळी - ८० ते ९० डझन, किवी -१०० ते १२०, स्ट्रॉबेरी-५० ते ६० ( लहान बॉक्स), चिंच-१०० ते १४०, अंजीर - २००, प्रतिनग टरबूज ५० ते ६०.
-- -
खाद्यतेल : सरकी -११० ते ११२, शेंगतेल - १७० ते १७५, सोयाबीन -११० ते ११२, पामतेल -१०५ ते ११०, सूर्यफूल -११५ ते १२०.
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३५ ते ५५, बार्शी शाळू- ४० ते ५३, गहू- ३० ते ३८, हरभराडाळ -६४ ते ६६, तूरडाळ- १२५ ते १३२, मूगडाळ- १०५ ते ११८, मसूरडाळ - ७८, उडीदडाळ- १०० ते ११०, हरभरा- ५५ ते ५८, मूग- ९४ ते १०५, मटकी- १२५ ते १३०, मसूर- ७०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ७५ ते ८३, हिरवा वाटाणा- ५५, छोला -१२५ ते १४०.
- - - - - - - - - - - -
तूरडाळीला पडतर लागेना
बाजारात सध्या व्यापाऱ्यांना पुरेसी तूर मिळत नाही. या दिवसात व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध होत असते; पण सध्या महाराष्ट्रासह कर्नाटकातील प्रमुख बाजारात तुरीची आवक खूपच कमी आहे. व्यापाऱ्यांना कमी तूर मिळत असल्याने तूरडाळीचे दरही वाढत आहेत.