
कन्या महाविद्यालयाची मनपास भेट
06292
इचलकरंजी : कन्या महाविद्यालायातील राज्यशास्त्र विभागाने महानगरपालिकेस अभ्यासभेट दिली.
----------
कन्या महाविद्यालयाची मनपास भेट
इचलकरंजी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागामार्फत इचलकरंजी महानगरपालिकेस
अभ्यासभेट दिली. विद्यार्थीनींना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय कामकाज कोणत्या पद्धतीने व कोणकोणत्या विभागामार्फत चालते याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवून देण्यासाठी या अभ्यासभेटीचे नियोजन प्राचार्या डॉ. प्रो. त्रिशला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केले. जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांच्या मदतीने व उपायुक्त केतन गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांची ओळख करून घेतली. विद्यार्थीनींनी विविध प्रश्न विचारून शंकाचे निरसन करून घेतले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वर्षा पोतदार, प्रा. डॉ. मीनाक्षी मिणचे, डॉ. मोहन कांबळे उपस्थित होते.