Sat, Sept 23, 2023

जिल्हा प्रशिक्षकपदी अशोक वरूटे
जिल्हा प्रशिक्षकपदी अशोक वरूटे
Published on : 11 May 2023, 4:23 am
06294
अशोक वरुटे
-------
जिल्हा प्रशिक्षकपदी
अशोक वरूटे
इचलकरंजी, ता. ११ : येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ता अशोक वरुटे यांची अनुभव शिक्षा केंद्राच्या जिल्हा प्रशिक्षकपदी निवड झाली. निवडीचे पत्र विभागीय प्रशिक्षक दिपक देवरे यांनी प्रदान केले. अनुभव शिक्षा केंद्र हे व्यक्तिमत्व विकासाचे एक नवे दालन असून जिल्ह्यातील युवकांसाठी खुले होत आहे. राष्ट्रीय युवा धोरणाच्या अंगाने युवा पिढीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न अनुभव कट्टे करताहेत. त्यात संविधानिक जाणीवांचे रोपण, नागरी समस्यांवर मांडणी तथा व्यसनमुक्त निरोगी राहण्यासाठीची जीवनशैली विकसित केली जाते, असे श्री. देवरे यांनी सांगितले. संजय रेंदाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. इंद्रायणी पाटील, शरद वास्कर, विनायक होगाडे, रोहित दळवी, अमित कोवे, दिग्विजय चौगुले, उर्मिला कांबळे आदी उपस्थित होते.