कन्या महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कन्या महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन
कन्या महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन

कन्या महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन

sakal_logo
By

ich142.jpg
02940
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन झाले.
कन्या महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन
इचलकरंजी : स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योतर कालखंडात भारतीय कवींनी इंग्रजी साहित्याला एक वेगळी ओळख प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. त्रिशला कदम यांनी केले. श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत आयोजित ‘प्री ॲण्ड पोस्ट इनडीपेंडन्स इंडियन इंग्लिश पोएट्स’ या विषयावरील भित्तीपत्रिकेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्राची केंगार हिने भित्तीपत्रिकेबद्दल माहिती दिली. विभागप्रमुख प्रा. दीपक सरनोबत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. रोहिणी जावीर हिने सूत्रसंचालन केले. श्रुती शंभूशेट्टी हीने आभार मानले. प्रा. संदीप पाटील, प्रा. रामेश्वरी कुदळे, प्रा. सुनिता पोवार यांसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
-----------
ich143.jpg
02942
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सन्मती बँकेस अभ्यास भेट दिली.

‘व्यंकटेश’ची सन्मती बँकेस भेट
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सन्मती बँकेस अभ्यास भेट दिली. महाविद्यालयातील ई -बँकिंग अँड ई - पेमेंट या शॉर्टटर्म कोर्सच्या विद्यार्थ्यासाठी ही अभ्यास भेट आयोजित केली. ऑडिट, डेटा सेंटर, रिकवरी, गुंतवणुक, क्लीअरींग, शेअर्स, कर्ज, रोख देवाणघेवाण, केवायसी या सर्व बँकिंग सेवा विभागांना भेट दिली. आधुनिक बँकिंगच्या बदलत असलेल्या नियमावली, सायबर सुरक्षित धोरण याविषयी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, ऑडिट विभागाचे प्रमुख अनंत पुजारी, सोमनाथ कुंभार, अनंत गिरमल यांनी दिली. अभ्यास भेटीचे नियोजन शॉर्ट प्रा. डॉ. दीपक कांबळे यांनी केले. यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने, उपप्राचार्य डॉ. एन.एम. मुजावर यांचे सहकार्य लाभले.
-----
दलित पँथर कार्यकारिणी निवड
इचलकरंजी : शहर व हातकणंगले तालुका दलित पॅंथरची बैठक झाली. यात विविध विषयांवर चर्चा करत विस्तारित कार्यकरणीची निवड केली. अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस प्रा. अशोक कांबळे होते. डी. एस. डोणे, अनिल कांबळे, युवराज जाधव आदींच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले. शहराध्यक्ष युवराज जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आनंदराव कांबळे, चंद्रकांत कांबळे, मच्छिंद्र कांबळे, तानाजी कांबळे, दस्तगीर जमादार, दत्ता गायकवाड, सुधीर कांबळे, मोहन नाईक आदी उपस्थित होते. आभार सचिन ओव्होळ यांनी मानले.