पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

पाणी पुरवठा संस्थेची विद्युत मोटार चोरली

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीकाठावरील इचलकरंजी सहकारी पाणी पुरवठा संस्थेची विद्युत मोटार अज्ञात चोरट्याने पळविली. २५ हजार रुपये किंमतीची २० अश्वशक्तीची पाण्याची मोटार चोरीस गेल्याची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबतची तक्रार अजिंक्य रावसाहेब दरिबे (रा. इचलकरंजी) यांनी पोलिसांत दिली आहे. या संस्थेने नदीकाठावर अनेक पाण्याच्या मोटरी बसवल्या आहेत.
---

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी : तीन मित्रांनी घरात घुसून विवेक वाडेल याच्या आई- वडीलांना दगडाने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अनिल इंगवले, प्रशांत इंगवले, आदित्य भुईंबर (सर्व रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. या मारहाणीत विवेकचे वडील सोमनाथ वाडेल (वय ४०) व आई श्रीदेवी वाडेल हे जखमी झाले आहेत. जुन्या वादातून ही घटना येथील गुरुकन्नननगर गल्ली नंबर ३ येथे घडली. याबाबतची फिर्याद जखमी सोमनाथ वाडेल यांनी पोलिसांत दिली आहे.