
नाईट कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
06308
इचलकरंजी : नाईट कॉलेज येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमात रामचंद्र निमणकर यांनी मार्गदर्शन केले.
नाईट कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
इचलकरंजी : नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स येथे माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा झाला. माजी विद्यार्थ्यांनी जीवनात प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाविद्यालयाविषयी श्रद्धा, विश्वास व अथक प्रयत्न करून जीवनात यशस्वी व्हावे, असे मत प्रमुख पाहुणे रामचंद्र निमणकर यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विरुपाक्ष खानाज होते. प्राचार्य डॉ. पुरंधर डी. नारे यांनी मार्गदर्शन केले. सोहेल इनामदार, वैभव लोकरे, अक्षय पाटील, सिद्धू सुतार, पूनम मस्के आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. एस. एल. रणदिवे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. एफ. एन. पटेल यांनी केले. आभार प्रा. डॉ. रामेश्वर सपकाळ यांनी केले. प्रा. डॉ. माधव मुंडकर, प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. प्रविण पोवार, प्रा. सौ. स्मिता मंतेरो उपस्थित होते.
----
06307
इचलकरंजी : ब्लॅक बेल्ट उच्च पदवी प्रमाणपत्र परीक्षेसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या शिबिरस्थळी पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी सदिच्छा भेट दिली.
राजू ताशिलदार यांची शिबिरास भेट
इचलकरंजी : संकटकाळी पोलिसांना संपर्क साधल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रसंगातून सुखरूप बचावण्यासाठी मार्शल आर्ट उपयोगी पडते. त्यासाठी आत्मसंरक्षण कला आत्मसात करावी, असे मत गावभाग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी व्यक्त केले. ब्लॅक बेल्ट या उच्च पदवी प्रमाणपत्र परीक्षेसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या शिबिरस्थळी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. अद्विता पुजारी, वैभवी तोष्णीवाल, जॉयलीन अंद्रादे, रितिका घाग, श्रीशा शिरगावे, नंदिनी शिंदे, रुद्र हासबे आणि अनीस सय्यद या खेळाडूंची ब्लॅकबेल्ट परीक्षेसाठी निवड झाली आहे. रवीकरण चौगुले यांनी स्वागत केले. संदीप पाटील, प्रदीप मळगणे, रोहित सुतार, रिया चौगुले,श्रेया चौगुले, मंजुनाथ बिरादार आदी उपस्थित होते.