Mon, Sept 25, 2023

चोरटा अटक
चोरटा अटक
Published on : 15 May 2023, 4:17 am
इचलकरंजीत मोटारसायकल चोरट्यास अटक
इचलकरंजी : शहापूर पोलिसांनी एका मोटारसायकल चोरट्यास अटक केली. सुनील पोपट पोवार ( वय २०, रा. पाटील किराणा स्टोअर्स जवळ, शहापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तक्रारदार भारत अरविंद हनुमंता जिद्दी (वय ४०, रा. योगाश्रमाजवळ, शहापूर) यांची मोटारसायकल १३ एप्रिलला चोरीस गेली होती. चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू असताना सुनील पोवार हा चोरीची मोटारसायकल घेऊन शहापूर येथील पाण्याची टाकीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी पोवार याने गुन्ह्याची कबुली दिली.